Share

Yuzvendra Chahal : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात चहलने अंपायला मारल्या लाथा बुक्क्या, व्हिडीओ झाला व्हायरल

Yuzvendra Chahal

Yuzvendra Chahal : टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या मस्तीखोर शैलीसाठी ओळखला जातो. चाहत्यांनाही त्याची शैली खूप आवडते. संघातील इतर खेळाडूंसोबत तो अनेक वेळा मस्ती करताना दिसला आहे. तो कोणत्याही खेळाडूशी मस्करी करायला कमी पडत नाही. त्याच वेळी, नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यादरम्यान, त्याचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(Yuzvendra Chahal, Team India, Umpire, South Africa)

ज्यामध्ये तो मजेदार पद्धतीने अंपायरसोबत मस्ती करताना दिसत आहे. खरं तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाच्या डावात पार्नेलचा चेंडू केएल राहुलला लागला, त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला आणि फिजिओला मैदानात बोलावण्यात आले. त्याचवेळी ऋषभ टॉवेल आणि पाण्याची बाटली घेऊन मैदानात आला.

दरम्यान, पंत संघातील इतर खेळाडूंसोबत असताना युझवेंद्र चहलने अंपायरशी मस्ती करायला सुरुवात केली. प्रथम युझवेंद्र चहलने अंपायरला गुडघ्यावर मारण्याचे नाटक करून त्रास दिला, त्यानंतर तो त्यांच्यासोबत मस्करी करताना दिसला. त्यांची मस्ती कॅमेऱ्यात कैद झाली. चहलचा हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

आत्तापर्यंत रोहित शर्माने युजवेंद्र चहलला T20 विश्वचषक 2022 चा एकही सामना खेळण्याची संधी दिलेली नाही. तो बेंचवर बसून इतर खेळाडूंना पाणी देताना दिसत आहे. त्याला आजवर आपल्या स्पिनरची जादू दाखवण्याची संधी मिळालेली नाही.

याचे कारण म्हणजे यंदाचा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जात असून येथील खेळपट्टी स्पिनरसाठी फायदेशीर नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाला 5 विकेट्सने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. संघाचा स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे.

महत्वाच्या बातम्या
Anupam Kher : काश्मिरमध्ये घर घेण्याचे ठरताच अनुपम खेर यांच्या आईच्या डोळ्यातून आले पाणी, म्हणाल्या…
uddhav thackeray : आमदार पाटलांची कमाल! केले तब्बल दोन लाख शेतकऱ्यांचे भले, होणार हजारो कोटींचा फायदा
Temba Bavuma: विजयानंतर हुरळून गेला टेंबा बावुमा, भारताला टोमणा मारत म्हणाला, आम्हाला इतरांसारखे स्वत:ला..

खेळ ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now