“ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी ताबडतोब भाजपमध्ये जा, मग तुम्हाला सगळं माफ”

गेले काही दिवसात इडी,सीबीआय, आणि आयकर विभागाने कलाकारांच्या आणि राजकीय नेत्यांवर कारवाई च तगादा लावला आहे. यावर ओबीसी परिषदेत बोलताना राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली आहे. तसेच ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी भाजपमध्ये जावं असा सल्ला त्यांनी उपस्थित असलेल्यांना दिला.

ओबीसी पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “इथे सगळे जण अनेक मुद्द्यांवर जोरजोरात बोलले. चर्चा केली. पण सावध राहा बाबा. उद्या इन्कम टॅक्स घरी नाही आला म्हणजे झालं. जो जो या कामात येईल, त्याला बरोबर उस चरख्यात टाकून रस काढला जातो, तसं काढायचं काम असतं हे. आता सध्या खडसे साहेबांच्या पाठिमागे ते लागले आहेत”.

तसेच ते म्हणाले, आपल्या बोलण्यामुळे ज्यांना भय वाटत असेल त्यांनी भाजपमध्ये जावं असा सल्ला त्यांनी दिला, “हे सगळं असं होत असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आपण जेव्हा एखादी भूमिका मांडतो, तेव्हा सावध राहा सगळे. जे घाबरले असतील, त्यांनी ताबडतोब भाजपामध्ये जायचं. मग तुम्हाला सगळं माफ. खरं तेच सांगतोय”

यावेळी त्यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली असून ते म्हणाले, “आत्ताच हे गुलाबराव पाटील बोलले. मंत्रिमंडळात देखील ते माझ्या पाठिशी ओबीसीच्या मुद्द्यावर बोलतात, त्याबद्दल त्यांचे आभार. ओबीसी मंत्री देखील खूप आहेत. मी कुणावर वैयक्तिक टीका करणार नाही. पण बोलणारे फार थोडे आहेत”

पत्रकार परिषदेत यावेळी तुरुंगात आपला जीव कपिल पाटील यांनी कसा वाचवला हे सांगताना ते म्हणाले, “कपिल पाटील यांनी माझा जीव वाचवला. जेलमध्ये जेव्हा मला टाकलं तेव्हा एकदा फार गंभीर प्रकृती झाली होती. तिथे सोपी गोष्ट असते, कुणालातरी जेलमध्ये टाकायचं. तो आजारी पडला की त्याच्याकडे बघायचं नाही आणि एक दिवस गेल्यावर म्हणायचं की हार्ट अटॅकने गेला. संपला विषय.

पण जेव्हा कळलं की भुजबळ एकदम सीरियस आहेत, तेव्हा हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले. म्हणाले, तुम्ही काय वागणूक देत आहात त्यांना. हॉस्पिटलमध्ये नेत नाहीत, नीट काळजी घेत नाहीत. तिथे मारून टाकणार की काय तुम्ही? नंतर शरद पवारांनी पत्रच पाठवलं, की भुजबळांना काही झालं, तर हे सरकार जबाबदार राहील. सुदैवाने मी बाहेर आलो” अस छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

 

महत्वाच्या बातम्या
…त्यावेळी कपिल पाटलांनी माझा जीव वाचवला; छगन भुजबळांनी सांगीतला ‘तो’ भयानक किस्सा
मोदींनी भाषणात गांधींचे नाव 4 वेळा घेतले पण गोडसे, गोळवलकर, सावरकरांची नावे का नाही घेतली?
एखादा विद्यार्थी फाशी घेऊन मारावा अस वाटतय का तुम्हाला, गरीब मुलांची परिस्थिती कधी कळणार?’
मीराचे नवे रूप आले प्रेक्षकांच्या समोर, बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून राड्याचा श्रीगणेशा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.