मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांना विरोध! केंद्रीय मंत्री हरसिमरत बादलांचा राजीनामा

दिल्ली | भाजपच्या घटक पक्षातील सहकारी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला आहे. त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयक लोकसभेत मांडली जाणार होती पण त्याआधीच त्यांनी राजीनामा दिला आहे.

हरसिमरत कौर बादल यांचा शिरोमणी अकाली दल हा पक्ष आहे. त्यांनी विधेयकांचा विरोध केला असून शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे. PTI ने यासंदर्भात वृत्त जारी केलं आहे.

पक्षाचे प्रमुख आणि हरसिमरत कौर बादल यांचे पती सुखभीर सिंह बादल यांनी याबाबत लोकसभेत घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारला आणि भाजपला आमचे समर्थन असेल पण शेतकरी विरोधी राजकारणाचे आम्ही समर्थन करणार नाही.

भाजपचे नवीन कृषी विधेयक शेतीमध्ये नवीन बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला जात होता मात्र या विधेयकाच्या विरोधात गेल्या अनेक आठवड्यांपासून आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणामधील शेतकरी निराश झाले आहेत.

सुखभीर सिंह बादल यांनी यांनी टीका केली आहे की, प्रस्तावित कायद्यांमुळे पंजाब सरकारने कृषी क्षेत्र उभं करण्यासाठी केलेली ५० वर्षांची मेहनत वाया जाईल. यावेळी त्यांनी पंजाबने धान्य निर्मितीसाठी भारताला स्वावलंबी होण्यासाठी केलेल्या मदतीचा उल्लेख केला.

महत्वाच्या बातम्या-

फुल्ल भरून धावणार ‘लालपरी’; मात्र एसटीत बसण्यासाठी ‘या’ गोष्टी बंधनकारक

‘खबरदार माझी तुलना रिया चक्रवर्ती सोबत केली तर…’

वाढीव वीजबिलावरून मनसेने महावितरणचे कार्यालय फोडले

‘ह्या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतील खतरनाक व्हिलन संस्कार पंडीत आठवतोय का?

‘मी क्षत्रीय, शीर धडावेगळं झाले तरी चालेल, पण ते कधीही झुकणार नाही’

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.