केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | भारतात कोरोनाचा कहर झाला आहे. देशातली रुग्णसंख्या 28 लाखांपार झाली असून 54 हजार जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राजस्थानच्या जोधपूरचे प्रतिनिधीत्व करत असून मोदी सरकारमधील ते चौथे कोरोनाबाधित मंत्री आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, धर्मेंद्र प्रधान आणि अर्जनराम मेघावाल हे बाधित झाले आहे.

जोधपूर भाजपचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र जोशी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शेखावत यांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी गजेंद्र शेखावत यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  त्यांनाही कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोरोनामुक्त झाले होते. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांची आणखी एकदा कोरोना चाचणी केली. तेव्हा त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.