काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे(Shivsena) खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे नेते किरीट सोमय्या(Kirit Somaya) यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. यामुळे किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगले.(central minister narayan rane banglow notice)
पण या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडी घेत शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाई करण्याचे निश्चित केले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मुंबईतील जुहू परिसरात ‘अधिश’ नावाचा बंगला आहे.
या बंगल्यात अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार मुंबई महानगर पालिकेकडे करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधिश’ बंगल्याच्या बांधकामामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेने बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली होती.
शुक्रवारी महापालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाच्या पथकाने बंगल्याची पाहणी केली होती आणि नोटीस देखील बजावली होती. आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी मुंबई महापालिकेकडे याबाबत तक्रार दिली होती. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत समुद्रापासून ५० मीटर परिसरात हा बंगला बांधण्यात आला आहे, असे आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी तक्रारीमध्ये सांगितले आहे.
तक्रार दाखल केल्यानंतर देखील मुंबई महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई महापालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महापालिका कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार महापालिकेने नारायण राणे यांना ही नोटीस पाठवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहा वाजता महापालिकेचे अधिकारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात जाणार आहेत. त्यानंतर महापालिकेचे अधिकारी जुहू येथे पोहचणार आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘अधिश’ बंगल्यावर मुंबई महापालिकेकडून काय कारवाई होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला पंतप्रधान पदाचा मान? के. चंद्रशेखर रावांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, काय घडलं या भेटींमध्ये?
तुमच्या बुद्धीला ताण द्या आणि यामध्ये दडलेला आकडा सांगा, ९९% लोकं झालेत फेल
केसीआर यांच्या बैठकीला आदित्य ठाकरेंच्या जागी तेजस ठाकरेंनी लावली हजेरी