Share

‘या’ कारणामुळे भाजप निवडणूकीत मुस्लिमांना तिकीटे देत नाही; अमित शहा स्पष्टच बोलले…

amit shah

सध्या उत्तर प्रदेश(Uttar Pradesh) राज्यात विधानसभेच्या निवडणुकीची धामधुम सुरु आहे. या निवडणुकांसाठी भाजप(BJP) पक्ष जोरदार तयारी करत आहे. उत्तर प्रदेश राज्यात भाजपचे सरकार आहे. तरीही भाजपने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. उत्तर प्रदेश राज्यात भाजप पक्षाला समाजवादी पक्ष आणि काँग्रेसशी लढा द्यावा लागणार आहे.(central minister amit shah statement on muslim candidate)

उत्तर प्रदेश राज्यात मुस्लिम उमेदवारांना तिकीट न दिल्याचा आरोप भाजपवर करण्यात आला होता. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिले नव्हते. यावेळी देखील त्यांची ही भूमिका कायम राखली आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा(Amit Shah) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना एका मुलाखतीत भाजप मुस्लिम उमेदवारांना तिकीट का देत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, “निवडणुकीत कोण मतदान करतं, ते देखील पाहावं लागतं. हा राजकीय शिष्टाचार आहे. पक्ष असल्याने निवडणुका जिंकणे देखील आवश्यक आहे.”

भाजपचे मुस्लिमांशी काय नाते आहे? असा प्रश्न अमित शहा यांना मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “सरकार आणि जबाबदार राजकीय पक्ष म्हणून जे नाते असले पाहिजे तेच नाते आहे. राज्यघटनेच्या आधारे सरकार चालते. सरकार निवडणे हे मतदारांच्या हातात असते.” या मुलाखतीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत प्रश्न विचारण्यात आले.

उत्तर प्रदेश राज्यात ३०० हुन अधिक जागा जिंकून सत्ता कायम राखू, असा विश्वास केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मुलाखतीत व्यक्त केला आहे. भाजप सरकारच्या काळात उत्तर प्रदेशात सर्व जाती धर्मांसाठी विकासाच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. शेतकरी, तरुण आणि महिला अशा सर्व वर्गांसाठी सरकारने उत्तम काम केलं आहे, असे अमित शहा यांनी मुलाखतीत सांगितले.

गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने २९ मुस्लिमबहुल जिल्ह्यांतील १६३ विधानसभा जागांपैकी १३७ जागा जिंकल्या होत्या. दलितांसाठी राखीव असलेल्या ३१ जागांपैकी २९ जागा भाजपला मिळाल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाला यापैकी केवळ २१ जागा जिंकता आल्या. तर काँग्रेसला फक्त २ जागा मिळाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या :-
प्रेमात शारीरीक संबंध बनवणे माझ्यासाठी…; दीपिका पदुकोणच्या खुलाश्याने सगळेच झाले हैराण
शेजाऱ्यांच्या ‘या’ भितीमुळे कच्चा बदाम गाणाऱ्या भुबन यांनी भुईमुग विकणे केले बंद, वाचून अवाक व्हाल
शिवसेना, राष्ट्रवादी ‘यासाठी’ नितीश कुमारांना देणार पाठिंबा, करणार मोठा धमाका

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now