१४ एप्रिल ही सार्वजनिक सुटी जाहीर; डॉ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारने केली घोषणा

मुंबई : येत्या १४ एप्रिल रोजी संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. यानिमित्त महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. परंतू, केंद्र सरकारने या जयंतीचे औचित्य साधून देशभरामध्ये हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर केला आहे.

डॉ. बी.आर. आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, १४ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामध्ये भारतामधील औद्योगिक आस्थापनांसह सर्व केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये Negotiable Instruments Act, १८८१ च्या सेक्शन २५ च्या अधिकारानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

तसेच कामगार, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन मंत्रालयाने याचे नोटिफिकेशन जारी केले आहे. यामुळे यंदापासून या दिवशी सरकारी कार्यालयांबरोबरच औद्योगिक आस्थापनांमध्ये सार्वजनिक सुटी देण्यात येणार आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची यंदा १३० वी जयंती आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बाबासाहेबांच्या जयंतीवर कोरोना व्हायरसचे सावट आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदाची भीम जयंती घरातच साजरा करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कुठे झाला?
भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, राजनीतीतज्ज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८१९ मध्ये झाला होता.

मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले.

महत्त्वाच्या बातम्या 

मुलांना सांभाळा! लहान मुलांना का होतोय कोरोना? डॉ. तात्याराव लहानेंनी सांगितले खरे कारण

अब्दुल सत्तार यांचा काँग्रेसला दणका! औरंगाबाद जिल्हा बँकेच्या अध्यक्षांचा शिवसेनेत प्रवेश…

मुंबईत लोकल प्रवासावर निर्बंध? धार्मिक स्थळे, माॅल बंद होणार; महापौरांनी दिले संकेत…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.