केंद्र सरकारची नवी योजना; कृषी क्षेत्रात नवीन संकल्पना बनवा आणि १ कोटीपर्यंत फंड मिळवा

दिल्ली | भारताचे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सरकार चालू आर्थिक वर्षात ११.८५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात ११२ वेगवेगळ्या भागीदारांद्वारे निवडलेल्या नवीन स्टार्टअपला हा निधी दिला जाईल.

कृषी-प्रक्रिया, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धित क्षेत्रात विविध भागीदार आणि कृषी व्यवसाय इनक्यूबेटर यांनी निवडलेल्या स्टार्ट अपला हा निधी देण्यात येईल, असे नरेंद्र सिंह तोमर यावेळी म्हणाले आहेत.

सुरुवातीच्या टप्प्यात कृषी प्रक्रिया, अन्न तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धनाच्या क्षेत्रातील ११२ स्टार्ट-अपला एक कोटी इतका निधी देण्यात येईल, असे तोमर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. या स्टार्ट अप्समुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सुरू केलेल्या इनोव्हेशन अँड अ‍ॅग्री-इंटरप्रूनर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हा निधी प्रदान केला जाईल. याशिवाय ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना संधी उपलब्ध करून देऊन त्यांचे उत्पन्न वाढविण्यात हातभार लावतील.

कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढवण्यावर भर देताना श्री तोमर म्हणाले की, युवकांना शेतीकडे आकर्षित करणे आणि या क्षेत्राचे पुनरुज्जीवन करणे हा या योजनेचा दृष्टीकोन आहे.

भारतीय शेती स्पर्धात्मक बनविणे, कृषी आधारित उपक्रमांना हातभार लावण्याची व लवकरात लवकर नवीन तंत्रज्ञान अवलंबण्याची गरज आहे. यावरही त्यांनी भर दिला आहे.

शेती क्षेत्रातील ओळखले जाणारे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शेतीतील कामकाजात अडचण कमी करणारी साधने व उपकरणांची रचना यांची असणारी गरज भागविण्यासाठी हॅकॅथॉन वर्षातून दोनदा आयोजित केले जाऊ शकतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.