केंद्र सरकारचा मुळावर घाव, थेट १०२ व्या घटनादुरुस्ती कायद्यात करणार बदल

मुंबई। ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची याचिका फेटाळून लावली व या निर्णयाचा त्यानंतर संपूर्ण मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता मोठी माहिती समोर येत आहे, केंद्र सरकार मराठा आरक्षणाच्या निकालानंतर आता १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करणार आहे.

नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर विधेयकात बदल करून नवे एसीईबीसी प्रवर्ग बनवण्याचा अधिकार आता राज्य सरकारांनाही देणार आहे. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला त्यावेळी १०२व्या घटनादुरुस्तीनंतर एखाद्या राज्याला एखादी जात मागास ठरवण्याचा अधिकार राहीलेला नाही, असा निकाल सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचने मराठा आरक्षणाचा निकाल देताना सांगितलं होतं.

हा अधिकार आता राष्ट्रपती, संसद यांच्याकडेच असल्याचंही सुप्रीम कोर्टानं निकालात स्पष्ट केलं. पण आता केंद्र सरकार राज्यांना अधिकार बहाल करुन, त्या त्या स्तरावर निर्णय घेण्याचे हक्क देत आहे. त्यासाठी १०२ व्या घटनादुरुस्ती विधेयकात बदल करण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण फेटाळ्यानंतर १०२ वी घटना दुरुस्ती ही अधिक चर्चेत आली. ११ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्र सरकारनं १०२ घटनादुरुस्ती करून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. या घटनादुरुस्तीमध्ये अनुच्छेद ३३८ (ब) चा समावेश करण्यात आला.

त्यानुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला मिळाला. तसंच, अनुच्छेद ३४२ (अ) नुसार, सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा याचे अधिकार राष्ट्रपती आणि संसदेला देण्यात आला. या कायद्याद्वारे राज्यघटनेत ५ कलमं समाविष्ट करण्यात आली. ३३८(ब), ३४२(अ) आणि ३६६ (२६क) ही तीन कलमं आणि कलम ३३८ (ब) यांचा समावेश करण्यात आला.

सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी ‘राष्ट्रीय मागास वर्ग आयोगा’ची स्थापना. आयोगामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर तीन असे एकूण पाच सदस्य असतील व त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतील. मात्र आता या १०२ व्या घटनादुरुस्ती मध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण, आत्महत्येपूर्वी मद्यप्राशन केल्याची धक्कादायक माहिती समोर
कधीही तक्रार करू नका आणि स्पष्टीकरण देऊ नका म्हणत शिल्पाने काढता पाय घेतला; सोशल मिडीयावर असे स्टेटमेंट केले जारी…
अभिमानास्पद! भारताच्या नावावर आणखी एक पदक, लवलीनाने कांस्य पदकावर कोरले नाव
..आणि सरणावरती असताना आजीच्या डोळ्याची पापणी आणि हात हलला, नेमका कसा झाला हा चमत्कार?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.