देशातील केंद्र सरकारी(Central Government) कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केली आहे. महागाई भत्त्यात ३% वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ३४% दराने महागाई भत्ता मिळू शकतो. कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्यात आली असून, त्यानंतर सर्वांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.(central government workers da allowence rise)
AICP निर्देशकांच्या आधारे २०२१ साठी निर्देशांकात एका अंकाची घट झाली आहे. त्यामुळे निर्देशांक ३६१ अंकांवर गेला आहे. महागाई भत्त्यासाठी १२ महिन्यांचा सरासरी निर्देशांक ३५१.३३ आहे. या सरासरी निर्देशांकावर ३४% महागाई भत्ता मिळू शकतो. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३१% महागाई भत्ता मिळत आहे.
जानेवारी २०२२ पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना ३% अधिक महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे महागाई भत्ता ३४% झाला आहे. ७ व्या वेतन आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार, मूळ वेतनावर महागाई भत्ता दिला जातो. या संदर्भात मार्च महिन्यानंतर घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचारी खुश झाले आहेत.
५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारी महिन्याअखेर सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी १७०.५ टक्के दराने डीए मिळत होता, तो आता १८४.१ टक्के करण्यात आला आहे.
सरकारच्या निर्णयाची माहिती देताना अधिकारी म्हणाले की, CPSEs च्या बोर्ड लेव्हल आणि खालील बोर्ड लेव्हल अधिकाऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळेल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आता १८४.१ टक्के दराने डीएचा लाभ मिळणार आहे. त्यामुले केंद्रीय कर्मचाऱ्यांना दुहेरी फायदा मिळणार आहे.
जुलै २०२१ मध्ये सरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली होती. जुलै २०२१ मध्ये, त्याचा महागाई भत्ता थेट १५९.९ टक्क्यांवरून १७०.५ टक्क्यांपर्यंत वाढला होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना डीएची थकबाकी देखील मिळणार आहे. यासंदर्भात सरकारकडून लवकरच घोषणा करण्यात येणार आहे .
महत्वाच्या बातम्या :-
घाबरले म्हणणाऱ्यांना नितेश राणेंचे जोरदार प्रत्यूत्तर; अटक करणाऱ्यांना पुन्हा दिली थेट धमकी
सलमान खानमुळे ‘Valentine Day’ला कतरिना होणार विकी कौशलपासून लांब; ‘हे’ आहे कारण
‘भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण?’