जन धन खाते असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जन धन खाते असणाऱ्या लोकांना दर महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत. एका योजनेअंतर्गत हे पैसे खातेधारकांना मिळणार आहेत. ‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दर महिन्याला तीन हजार रुपये जन धन खाते धारकांना देणार आहे.(central government scheme give three thousand per month)
जन धन खाते धारकांना पेन्शनच्या स्वरूपात हे पैसे मिळणार आहेत. या योजनेमध्ये १८ ते ४० वर्षापर्यंतचा कोणताही व्यक्ती सहभागी होऊ शकतो. या योजनेत सहभागी होणाऱ्या व्यक्तीला ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याच्या बँक खात्यात हे पैसे ट्रान्सफर केले जातात. एका वर्षात ३६ हजार रुपये ट्रान्सफर केले जातात.
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. असंघटित क्षेत्रात स्ट्रीट व्हेंडर, हेड लोडर, वीटभट्टी कामगार आणि रिक्षाचालक इत्यादी कामगार येतात. यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, या लोकांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे.
‘पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना’ या केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे जन धन खाते असायला हवे. जन धन खाते नसल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे यासाठी आधारकार्ड देखील आवश्यक आहे. तसेच तुम्हाला बँकेत बचत खात्याची माहिती द्यावी लागेल. वेगवेगळ्या वयोगटानुसार कामगारांना दर महिन्याला ५५ ते २०० रुपये भरावे लागणार आहेत.
या योजनेअंतर्गत ३० वर्षाच्या व्यक्तीला १०० रुपये भरावे लागतील. तर ४० वर्षाच्या व्यक्तीला २०० रुपये भरावे लागतील. सुरवातीला या योजनेत नाव नोंदवावे लागेल. त्यासाठी तुमच्या बचत खात्याचा किंवा जनधन खात्याचा आयएफएस कोड असणे आवश्यक आहे. १५ हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
ही योजना सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १ फेब्रुवारी २०१९ रोजी केली होती. १५ फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना लागू करण्यात आली आहे. असंघटित क्षेत्रातील ४०० विविध व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या २५ कोटींहून अधिक कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
१२ रुपयांच्या या शेअरने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा, एका लाखाचे झाले १.६४ कोटी रुपये
५ मिनीटांत ५० टक्के चार्ज होणारा मोबाईल लवकरच भारतात होणार लाॅंच; फिचर्स वाचून खूष व्हाल
फक्त ३५ पैशांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना दिले छ्प्परफाड रिटर्न, पाच महिन्यात एका लाखाचे झाले १३ कोटी