मोठी बातमी! बँक ऑफ महाराष्ट्रासह ‘या’ सरकारी बँकांचे मोदी सरकार करणार खासगीकरण

मुंबई | देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या कमी करून ५ करण्याची योजना केंद्र सरकारची आहे. तसेच सरकार आणखी ४ बँकांचे खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे.

तसेच ही प्रक्रिया या आर्थिक वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या चार बँकांमध्ये पंजाब आणि सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, यूको बँक आणि आयडीबीआय बँक यांचा समावेश आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, सरकारचा या बँकांमध्ये निम्म्याहून अधिक हिस्सा थेट किंवा अप्रत्यक्षरित्या आहे. सरकार बँका आणि इतर सरकारी कंपन्यांमध्ये भागभांडवलाची विक्री करून निधी गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.

याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाने दोन अधिकाऱ्यांना किमान चार सरकारी मालकीच्या बँकांमधील भागभांडवल विक्रीची प्रक्रिया वेगवान करण्यास सांगितले आहे. याबाबतचे वृत्त इकोनॉमिक टाईम्सने दिले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.