आता शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये प्रतिमहिना पेन्शन, ‘या’ सरकारी योजनेचा मोफत लाभ मिळवा

नवी दिल्ली | केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान किसान पेन्शन योजनेत २१,१९,३१६ शेतकऱ्यांनी आपले म्हतारपण सुरक्षित केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेन्शन योजनेत नावाची नोंदणी प्रक्रिया पुर्ण केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणे सोपे आहे.

‘पंतप्रधान किसान मानधन योजना’ असे या योजनेचे नाव आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ सप्टेंबर २०१९ ला झारखंड राज्यात ही योजना सुरू केली होती. परंतु यासंदर्भातील नोंदणीला ९ ऑगस्टपासूनच सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी असलेली ही योजना सर्वात मोठी पेन्शन योजना असल्याचे म्हटले जात आहे.

यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे कृषी मंत्रालय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार प्रंधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांना या निवृत्तीवेतनाचा लाभ घेणे सोपे आहे. कारण त्यांच्यासाठी हे विनामुल्य असणार आहे. किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांकडून या योजनेचा प्रीमियम घेतला जाणार नाही. त्याऐवजी सरकारकडून वार्षिक स्वरुपात देण्यात येणाऱ्या ६००० रुपयातून ते पैसे वजा केले जातील. यासाठी शेतकऱ्यांना तसा पर्याय निवडावा लागणार आहे.

पंतप्रधान मानधन योजनेत वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यावर महिन्याला ३००० रुपये पेन्शन मिळेल. या योजनेत हरियाणा या राज्यातील शेतकरी लाभार्थ्यांची संख्या मोठी आहे. प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेविषयी आपण शेतकरी कॉल सेंटर नंबर १८००-१८०-१५५१ वर कॉल करुन माहिती घेऊन शकता.

नोंदणीसाठी या गोष्टी करा:
पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर येथे नोंदणी केली जाते.
प्रत्येकाने आधार कार्ड देणे महत्त्वाचे आहे.
तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नसेल तर तुम्हाला यासाठी सातबाऱ्याची प्रत द्यावी लागेल.
२ फोटो आणि बँक पासबुक देखील आवश्यक आहे.
नोंदणीदरम्यान किसान पेन्शन युनिक क्रमांक आणि पेन्शन कार्ड तयार होईल.

या योजनेअंतर्गत निम्मे प्रीमियम केंद्र सरकार देणार आहे. तर निम्मे तुम्हाला भरावे लागणार आहेत. तुम्ही या योजनेतून हेव तेव्हा बाहेर पडू शकता. यामध्ये तुमचे पैसे बुडणार नाहीत. या जमा ठेवीवर बँकांच्या बचत खात्याइतकेच व्याज दिले जाणार आहे.

तसेच दर पॉलिसीधारक शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला ५० टक्के रक्कम दिली जाणार आहे. तिला १५०० रुपये दरमाह दिले जातील. भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) शेतकऱ्यांच्या पेन्शन फंडाचे व्यवस्थापन करेल. त्याचे प्रीमियम किमान ५५ रुपये आणि जास्तीत जास्त २०० रुपये असणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
बातमी कामाची! तुम्हाला किसान निधीचे २००० रुपये मिळाले नसतील तर करा ‘हे’ काम, पैसे जमा होतील
राज्यातही पीएम किसान योजनेत घोटाळा; हजारो अपात्र व्यक्तींनी घेतला लाभ
‘या’ सरकारी योजनेअंतर्गत तुम्हाला मिळेल फ्री गॅस सिलिंडर; आज आहे शेवटची तारीख
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! देशात पहिल्यांदाच सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर होणार लॉन्च

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.