आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु; पुन्हा एकदा नोटबंदी?

मुंबई | १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा विचार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत आहे. याबाबत आरबीआयचे असिस्टंट जनरल मॅनेजर बी महेश यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘मार्च किंवा एप्रिलपर्यंत आरबीआय १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा चलनातून बाद करण्याचा विचार करत असल्याची त्यांनी माहिती दिली. ते जिल्हास्तरीय सुरक्षा समिती आणि जिल्हास्तरीय चलन व्यवस्थापन समितीच्या बैठकीत बोलत होते.

तसेच ‘१० रुपयांच्या नाण्याला अद्यापही व्यापारी तसेच उद्योजकांकडून स्वीकारले गेले नसल्यावरुन बी महेश यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “१० रुपयांचं नाणं आणून १५ वर्ष झाल्यानंतरही व्यापारी आणि उद्योजकांनी त्याचा स्वीकार न करणं बँका आणि आरबीआयसाठी मोठी समस्या झाली आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये आरबीआयने १०० रुपयांची नवी जांभळ्या रंगातील नोट आणली होती. याबाबत बोलताना बी महेश यांनी १०० च्या नव्या नोटा चलनातून बाद होणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर अजित पवार म्हणतात…
हृदय हेलावून टाकणारी घटना; ‘आईला कंपनीत जाऊन येतो म्हणाला अन्…’
धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील संतापले, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.