केंद्राने डोस कमी दिले असले तरी राज्य लसीकरणात पहिल्या नंबरवर, जाणून घ्या आकडेवारी

मुंबई । कोरोनामुळे देशात लसीकरण गरजेचे आहे. असे असले तरी लसीचा मोठा तुटवडा जाणवत असून ते वाढवणे गरजेचे आहे. यातच १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सगळ्यांना लस देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. मात्र अपुरे डोस असल्याने याला वेग येत नाही.

सगळ्या गोष्टी सुरू असल्या तरी राज्याने लसीकरणामध्ये अव्वल कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत सर्वाधिक नागरिकांना लसीकरण केल्याची बाब महाराष्ट्राच्या खात्यात जमा होती. आता लसीचे दोन्ही डोस मिळालेले सर्वाधिक नागरिक महाराष्ट्रात आहेत.

असे असले तरी लस वाटपाबाबत महाराष्ट्रावर अन्याय केला जात असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील यावरून केंद्र सरकार टीका केली. लोकसंख्या आणि रुग्णांचा विचार करता महाराष्ट्राला जास्त डोस मिळायला हवे होते.

इतर राज्यांची लोकसंख्या कमी आहे, तरी त्यांना लस मोठ्या प्रमाणावर देण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला १.६४ कोटी, उत्तरप्रदेशला १.४६ कोटी, राजस्थानला १.३९ कोटी तर गुजरातला १.३३ कोटी डोस देण्यात आले आहेत.

गुजरातमध्ये लोकसंख्या कमी असताना जास्त लस देण्यात आली आहे. यामुळे गुजरातवर विशेष प्रेम दाखवले जात आहे. असे असले तरी लसीकरण करण्यात महाराष्ट्राने पहिला नंबर मिळवला आहे.

राज्यात आत्तापर्यंत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी तब्बल २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोणत्याही राज्याने लसीचे दोन्ही डोस दिलेल्या नागरिकांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे, असे आरोय विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तसेच राज्यात १८ ते ४४ वयोगटात आत्तापर्यंत या वयोगटातल्या १ लाख ५३ हजार ९६७ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत. यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे.

ताज्या बातम्या

पंढरपुरच्या निवडणूकीचे हादरे नांदेडपर्यंत; तीनवेळा आमदार झालेला शिवसेना नेता भाजपच्या वाटेवर

साताऱ्यात राडा! मराठा आंदोलकांनी मंत्र्याच्या घरावर फेकले शेण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, कार्यालयावर दगडफेक

मराठा आंदोलनाचा भडका! मंत्री शंभूराज देसाईंच्या घरावर फेकले शेण, कार्यालयही फोडले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.