CBSE १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षांबाबत शिक्षण मंत्र्यांनी केली मोठी घोषणा

मुंबई | कोरोना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावरही मात करुन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने १० आणि १२ वीच्या परिक्षांची तारीख २ फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची घोषणा केली आहे.

याबाबत सीबीएसई १० वी आणि १२ वी परीक्षांची डेटशीट २ फेब्रुवारी २०२१ ला जारी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशांक’ यांनी याबाबत माहिती दिली आहे. यावेळी सीबीएसई १० वी आणि १२ वी विद्यार्थ्यांची परीक्षा ४ मे पासून सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘सीबीएसईसह अनेक शिक्षा बोर्डात नवी शिक्षा नीती लागू करण्याच्या दिशेने काम सुरु केले आहे. नव्या शिक्षण नीतीचा रस्ता याच बोर्डाकडून जाईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या नव्या शिक्षण नीतीमध्ये विद्यार्थी सहावीपासून वोकेश्नल शिक्षण मिळवतील. सहावीच्या वर्गापासूनच करिअरची दिशा ठरवण्याची त्यांना संधी मिळेल, असेही रमेश पोखरियाल ‘निशांक’ म्हंटले आहे.

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेची तारीख अखेर जाहीर…
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे. “इयत्ता १२ वी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे २०२१ या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाईल”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

तर इयत्ता १० वीची परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे २०२१ च्या दरम्यान घेतली जाणार आहे. तर या परीक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस जाहीर केला जाईल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या
तुमचं PAN Card व्हेरिफाय करायचंय? ‘या’ पद्धतीचा वापर करा २ मिनिटांत होईल काम
बेरोजगारांना मोदी सरकार देतंय महिन्याला ३८०० रुपयांचा भत्ता?; वाचा व्हायरल मेसेजमागील सत्य
तुमच्या वाहनाच्या नंबरप्लेटचा शेवटचा आकडा ‘१’ असेल तर ही बातमी वाचाच; भरावा लागू शकतो दंड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.