क्लार्कच्या घरी सापडले २ कोटींचे घबाड, ८ किलो सोने, नोटा मोजण्याची मशीन, सीबीआयही चक्रावली

भोपाळमधल्या एक क्लार्कच्या घरी कुबराचा खजाना सापडला आहे. तो क्लार्क फूड ऍन्ड कॉर्पोरशन ऑफ इंडिया क्लार्क या पदावर कार्यरत आहे. या क्लार्कच्या घरात २.१७ कोटी रूपये, ८ किलो सोने आणि नोटा मोजायची मशिन सापडली आहे.

त्या भागातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या होत्या त्यामुळे सीबीआयच्या एका टीमने या क्लर्कच्या घरी छापा मारला होता. त्यानंतर त्यांना हे घबाड सापडलं आहे. किशोर मीणा असं त्या क्लर्कचे नाव आहे. तो छोला परिसरातील रहिवासी आहे.

सीबीआयला त्याच्याविरोधात लाच घेत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्याची दखल घेत सीबीआयने त्याच्या घरी शुक्रवारी रात्री छापा मारला. त्याच्या घरी सीबीआयची अजूनही कारवाई सुरू आहे. त्याच्या घरातून भ्रष्टाचाराचे पुरावेही सापडले आहेत.

या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. लाच घेतल्यानंतर जी मिळालेली रक्कम आहे ते घरीच ठेवत असत. मिळालेल्या माहितीनुसीर मीणा हे सुरूवातीला एफसीआयमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. बड्या अधिकाऱ्यांसोबत भ्रष्टाचार करू लागल्याने त्याला क्लार्क करण्यात आले होते.

सीबीआयला त्याच्या घरातून नोटा मोजायची मशिन आणि २.१७ कोटी रूपये सापडले आहेत. त्याचसोबत ८ किलो सोनं आणि चांदीही जप्त करण्यात आली आहे. एका क्लार्ककडे इतके मोठे घबाड सापडल्याने सीबीआयचे अधिकारीही अवाक झाले आहेत.

गुडगावच्या सेक्युरिटी कंपनीने सीबीआयकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली होती. एफसीआयचे मॅनेजर दुसऱ्या कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करून उघडपणे लाच घेत आहेत अशी माहिती मिळाली होती. ही बातमी मिळताच सीबीआयने जाळं आखलं होतं. सीबीआयने आरोपींना एका मंदिरात बोलावले होते आणि तिथं लाच घेताना रंगेहात पकडलं होतं.

महत्वाच्या बातम्या
अरे कुठून धरून आणलंय हिला! राखी सावंत मस्तानीच्या वेशात रस्त्यावर शोधतीये आपल्या नवऱ्याला
PSI सह पाच पोलिस निलंबित; निरपराध व्यक्तीला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने कारवाई
या आजोबांच कोरोनासुद्धा काही वाकडं करू शकत नाही; व्हिडीओ पाहून पोटं धरून हसाल
भररस्त्यात गोळीबार करुन डॉक्टर दाम्पत्याची हत्या; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.