CBI : सध्या फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशभर राजकीय वातावरण तापलेले आहे. देशातील काही राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहे. देशात काही महिन्यातच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष तयारी करत आहेत.
यात भारतीय जनता पार्टीसाठी गुजरात हे सर्वात महत्वपूर्ण राज्य आहे. गुजरात हे राज्य मागच्या काही दशकांपासून भारतीय जनता पक्षाचे गड राहिलेले आहे. सोबतच गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे गृहराज्य आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीला आज पर्यंत विरोधीपक्ष म्हणून कॉंग्रेसकडून टक्कर मिळाली आहे. पण या निवडणुकीत भाजपाला आम आदमी पार्टीकडून चांगलीच टक्कर मिळत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी एकमेकांवर राजकीय आरोप प्रत्यारोप करत आहेत.
आम आदमी पक्षाचे नंबर दोन समजले जाणारे आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर दिल्लीत दारूचे परवाने वाटताना हेराफेरी केल्याचा आरोप आहे. याच आरोपाखाली CBI ने त्यांची काल 9 तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
त्यांनी बाहेर आल्यानंतर CBI च्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, CBI च्या अधिकाऱ्यांनी मला भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्यास सांगितले. जर मी तसं नाही केल तर त्यांनी मला खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली आहे. सोबतच मी जर भारतीय जनता पार्टीत सहभागी झालो तर ते मला दिल्लीचा मुख्यमंत्री बनवतील असे ही CBI च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांच्या या आरोपांवर CBI कडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. CBI ने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सोबतच या प्रकरणाची तपासणी पुढेही कायदेशीररित्या चालूच राहणार आहे. असेही CBI ने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
Vasant more : ‘घाबरू नका, मी अजून जागा आहे’! तुफान पावसात नागरीकांच्या मदतीसाठी वसंत मोरे रस्त्यावर, लोकं म्हणाली..
Rajasthan: ‘या’ जत्रेत मुली लिव्ह-इनसाठी शोधतात मुलं, नंतर मुल झाल्यानंतर करतात लग्न, वाचून अवाक व्हाल
Kolhapur : ‘…तेव्हा का संस्कृती जपली नाही?’; काँग्रेसची रणरागिणी भाजपविरोधात कडाडली