सुशांत केसची सीबीआयची चौकशी पुर्ण हायकोर्टात अहवाल देणार; जाणून घ्या काय निष्कर्ष निघाला..

अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जुनला त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.

त्यासाठी त्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी सुशांतच्या घरच्यांनी आणि फॅन्सनी केली होती.
सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला होता. बॉलीवूडमधील अनेक रहस्य समोर आले होते.

म्हणून सुशांतचा मृत्यू आत्महत्या नसून हत्या आहे. असे बोलले जात होते. या प्रकरणात सुशांतची कथित गर्लफेंड रिया चक्रवर्तीवर देखील अनेक आरोप करण्यात आले होते. सुरुवातीला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलीस करत होते.

पण त्यावेळी मुंबई पोलीसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. लोकांनी सुंशात प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले होते.

या प्रकरणात अनेक गोष्टींचा खुलासा झाला होता. ड्रग अँगल देखील समोर आला होता. ड्रगच्या प्रकरणात बॉलीवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांच्या नावाचा खुलासा झाला आहे. त्यासोबतच नेपोटिझमचा मुद्दा देखील खुप जास्त चर्चेत आला होता.

असे बोलले जात होते की, सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नसून हत्या आहे. पण आत्ता सुत्रांच्या माहीतीनुसार सीबीआयची सुशांतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी पुर्ण झाली आहे. सीबीआयला या प्रकरणात कोणतेही कटकारस्थान आढळले नाही.

सीबीआयने या प्रकरणाची चौकशी पुर्ण केली असून त्यांनी या संदर्भाचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल पाटणाच्या सीबीआय कोर्टात सादर केला जाणार आहे. या प्रकरणात कोणतीही संशयास्पद माहीती समोर आली नाही. असे सांगण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

सुशांत प्रकरणात बाॅलीवूड अभिनेत्याचे खळबळजनक वक्तव्य; म्हणाला..

या’ व्यक्तिने दिली सुशांतचा मित्र सॅम्यूअलला जीवे मारण्याची धमकी

रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना सोडणार नाही; पहा कुणी दिलीय ही धमकी

एकेकाळी स्वतः रोलर फिरवून खेळपट्टी तयार करण्याचे काम करायचा, आज गाजवतोय IPL

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.