सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला ‘हा’ व्यक्ती सीबीआयच्या रडारवर!

मुंबई | सुशांतसिंग राजपूत आत्महत्या होऊन अनेक दिवस उलटले आहे. मात्र अजूनही या प्रकरणाचा तपास लागत नाही. सीबीआय आता या प्रकरणी तपास करत आहे.

या प्रकरणात करणी सेनेचा कार्यकर्ता सुरजित सिंह याने अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र संदीप सिंह हाच खरा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला. यानंतर संदीप सिंह देखील आता सीबीआयच्या रडारवर आला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर संदीप सिंह अनेकदा कॅमेऱ्यासमोर दिसला. सुशांतच्या बहिणीसोबत तो रुग्णालयातही आला. त्यामुळे आता लवकरच सीबीआय संदीप सिंहची देखील चौकशी करण्याची शक्यता आहे.

संदीप सिंह सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरापासून रुग्णालयापर्यंत मितू सिंहसोबत दिसून आला. संदीप सिंहसोबतचे अनेक फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

या फोटोंमध्ये संदीप, सुशांत आणि अंकिता लोखंडेही फोटो दिसत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर सुशांतचे पार्थिव कूपर रुग्णालयात आणले गेले.

या सर्व घडामोडीत संदीप सिंह रुग्णालयातच होता. मात्र, आता याच संदीप सिंहवर रुग्णालयात उपस्थिती असलेला प्रत्यक्षदर्शी सुरजित सिंहने गंभीर आरोप केले आहेत.

संदीप सिंह हा सुशांतचा मित्र आहे. सुशांत आणि संदीपने एकत्र चित्रपट क्षेत्रात करियर सुरु केले होते. सुशांतने आत्महत्या केल्याचे समजताच संदीप घटनास्थळी आला आणि मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला.

याप्रकरणी आता त्याची देखील सीबीआय चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

माहीला पाहिल्यावर नवऱ्याची आठवण येते; सानिया मिर्झाने केली माहीची तुलना पाकिस्तानी खेळाडूशी 

महेंद्रसिंग धोनीला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते- सानिया मिर्झा

“प्रशांत भूषण यांनी आपल्या मनातील प्रश्नांना वाचा फोडलीय, त्यांच्या पाठीशी निर्भयपणे उभे रहा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.