एटीएम कार्डने नाही तर फिंगरप्रिंटच्या मदतीने काढता येणार पैसे; नेमके कसे वाचा सविस्तर 

मुंबई | भारतातील अनेक बँका एटीएम / डेबिट कार्ड न वापरता एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा देत आहेत. परंतु, यासाठी एक मोबाइल नंबर आणि पिन आवश्यक आहे. परंतु आता एटीएम कार्ड आणि मोबाइलच्या मदतीशिवाय पैसे काढता येणार आहे. हे कसे शक्य आहे चला जाऊन घेऊयात.

मुंबईत देशातील पहिले आधार कार्डवर आधारित एटीएम बँकेने स्थापित केले होते. तेव्हा डीसीबी बँकेने ही सुविधा २०१६ मध्ये सुरु केली होती. या सिस्टीमनुसार बँक खातेदार त्याच्या फिंगरप्रिंट, रेटिना स्कॅन इत्यादीद्वारे ओळखला जातो. सध्या डीसीबी बँक आपल्या एटीएम मशीनवर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन सुविधा देत आहे.

जर आपणही पुढच्या वेळी एटीएममध्ये जाताना कार्ड घेण्यास विसरलात तर काळजी करण्याची गरज नाही. विचार करू नका, वेगवान बदलणार्‍या तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाले आहे. ही सुविधा भारतातील खासगी क्षेत्रातील विकास पत बँक (डीसीबी बँक) एटीएममध्ये उपलब्ध आहे. वास्तविक, डीसीबी बँक एटीएममध्ये आधार-आधारित ऑथेंटिकेशन सुविधा उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने बँक ग्राहक एटीएम कार्डमधून पैसे काढू शकतात.

दरम्यान, या सुविधेसाठी ग्राहकांची खाती आधार कार्ड नंबरशी लिंक असणे गरजेचे आहे. तसेच आजकाल बहुतेक ग्राकांची बँक खाती आधार कार्डाशी जोडलेली आहेत. डीसीबी बँकेच्या ग्राहकांना हे कार्ड एटीएम मशीनमध्ये नेण्याची गरज भासणार नाही. याचे कारण असे की, खाते होल्डरची माहिती केवळ फिंगरप्रिंटद्वारे ओळखले जाईल.

 

महत्त्वाच्या बातम्या 

दिवाळीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट? आरोग्यमंत्री म्हणतात…

तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.