हातात छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागणारा मी कर्णधार नाही, म्हणून एवढ्या IPL जिंकल्या

दुबईमध्ये काल रंगलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

दुखापतीमुळे काही सामने तो खेळू शकला नव्हता. मात्र अंतिम सामन्यात त्याने निर्णायक खेळी केली. सामना संपल्यानंतर रोहितने संघाच्या विजयाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला, आपले नेतृत्व हे हुकुमशहासारखे नाही हेच मुंबई इंडियन्सच्या यशामागचे महत्वाचे कारण असल्याचे रोहितला वाटते. हातात छडी घेऊन खेळाडूंच्या मागे लागणारा मी कर्णधार नाही. कर्णधार म्हणून मी फक्त त्यांना आत्मविश्वास देऊ शकतो. संघात समतोल असणे गरजेचे असते.

यापेक्षा अधिक चांगल्या खेळाची आम्ही अपेक्षाही केली नव्हती. पहिल्या चेंडूपासून आम्ही आमचे काम चोख बजावले. माझ्यामते पडद्यामागे काम करणाऱ्या व्यक्तींचेही यात मोठ श्रेय आहे, अनेकदा त्यांना म्हणावे तितके श्रेय मिळत नाही.

रोहित भारतीय संघात देखील चांगली कामगिरी करत आला आहे. मोठ्या षटकारांसाठी तो ओळखला जातो. अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत. यंदाची आयपीएल जिंकून यामध्ये अजून भर पडली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.