एटीएम कार्ड नसलं तरी काढू शकतात पैसे; जाणून घ्या ‘ही’ सर्वात सोपी पद्धत

 

मुंबई | अनेक लोक खिशात कॅश ठेवत नाही. ते नेहमीच आपल्या खिशात एटीएम कार्ड ठेवतात, जशी त्यांना पैशांची गरज पडते त्यानुसार ते पैसे काढत असतात, पण जर तुमचे एटीएम कार्ड घरी राहिले किंवा कुठे हरवले, तर मात्र अशा वेळी वाट लागते.

आता अशा गोष्टींमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसीबीआय) आपल्या ग्राहकांना कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रधान केली आहे. यामुळे आता ग्राहकांना डेबिट कार्ड नसल्याशिवाय  एटीएममधून  सुरक्षित आणि रोख रक्कम काढणे शक्य आहे.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे एसीबीआयचे योनो अॅप (Yono)  असणे गरजेचे आहे. हे अॅप वापरून तुम्ही डेबिट कार्ड न वापरता पैसे काढू शकतात.

एसीबीआय ग्राहकांनी जाणून घ्या एटीएम नसताना पैसे कसे काढाल-
१) सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये योनो अॅप डाऊनलोड करा.

२) व्यवहार सुरू करण्यासाठी ‘योनो कॅश ऑप्शन्स’ वर जा.

३) नंतर एटीएम सेक्शनमध्ये जा आणि हवी ती रक्कम टाका. (किमान ५०० आणि जास्तीत जास्त १०,०००)

४) एसीबीआय आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला कॅश ट्रांझेक्शन नंबर पाठवेल. तो नंबर चार तासांसाठी वैध असेल.

५) त्यानंतर एसीबीआय एटीएमवर जा आणि एटीएम स्क्रीनवर योनो कॅश निवडा.

६) तुम्हाला आलेला योनो कॅश पिन तिथे टाका आणि मान्य (accept) करा.

दरम्यान, ही सेवा दुसऱ्या बँकांमधील एटीएममधून पैसे काढण्यासाठीही वापरली जाऊ शकते. तसेच तंत्रात काही बिघाड झाल्यास किंवा पैसे काढताना रक्कम न येऊन बँकेतून पैसे वजा झाल्यास चिंता करू नका, फक्त याबाबत बँकेस त्वरित माहिती द्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.