मुंबई | राज्य अगोदरच कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहे, अशातच आता बर्ड फ्लूच्या रूपात नवीन संकट उभं राहिले आहे. अशातच बर्ड फ्लूचा माणसांना धोका आहे का? चिकन आणि अंडी खाल्ल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो का? बर्ड फ्लू माणसाला होऊ शकतो का? असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये आहेत.
याबाबत सांगताना डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, “बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांमधून माणसांत नाक आणि तोंडावाटे होऊ शकतो. कोंबडी किंवा इतर पक्षी शिंकत किंवा खोकत नसले तरी कोंबडीच्या नाकातून, तोंडातून द्रव निघत असतो. त्याच्याशी माणसाचा संपर्क आला आणि माणसाच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे द्रव शरीरात गेल्यास बर्ड फ्लूची लागण होऊ शकते.’
अंडी, चिकन खाणाऱ्यांना पशूसंवर्धनमंत्र्यांनी दिला ‘हा’ सल्ला
चिकन, अंडी खाणार असाल तर ७० डिग्री सेल्सिअस तापमानावर अर्धा तास चिकन, अंडी शिजवा आणि मगच खा, असा सल्ला राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.
ते म्हणतात, ‘अंडी किंवा कोंबडी यांना आपण विशिष्ट तापमाणावर अर्धातास जर शिजवलं, तर त्यातील जीवाणू मरून जातो. हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून जनेतला एवढंच सांगणं आहे की, अंडी किंवा चिकन अर्धा तास ७० डिग्री अंशावर शिजवलं पाहिजे. असे केल्यास त्यामधील जीवाणू मरून जातात, जे तुमच्यासाठी सुरक्षित असेल.’
दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात चिकनमधून कोरोना होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र बर्ड फ्ल्यूबाबतच्या चुकीच्या अफवा पसरवून पोल्ट्री व्यवसाय अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
‘राज्यात पोपट मरतात, कावळे मरतात फक्त महाविकास आघाडी सुरक्षित’
…अन् सिरम इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्याला भावना अनावर; ‘आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाले’
विराट की अनुष्का; कुणासारखी दिसते ‘विरुष्का’ची लेक? पहा पहिलावहिला सुपरक्यूट फोटो