Share

सलग ८ सामने गमावल्यानंतरही मुंबई प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? जाणून घ्या संपुर्ण गणित

मुंबई

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स (MI) सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. आयपीएल २०२२ मध्ये, मुंबई इंडियन्सला आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही आणि टीमने सलग ८ सामने गमावले आहेत. आयपीएलच्या कोणत्याही सीजनमधील पहिले ८ सामने हरणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे.(can-mumbai-reach-the-playoffs-after-losing-8-matches-in-a-row)

मुंबई इंडियन्स या सीजनमधून जवळपास बाहेर पडली आहे, कारण या संघाचे आता फक्त ६ सामने शिल्लक आहेत आणि प्लेऑफचा रस्ता खूपच कठीण झाला आहे. मात्र, तरीही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकेल का, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे.

मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ८ सामने खेळले असून एकही सामना जिंकलेला नाही. मुंबई इंडियन्सचा नेट-रनरेट देखील -१,००० आहे, जो सर्वात कमी आहे. मुंबई इंडियन्स एक प्रकारे आयपीएल २०२२ मधून जवळपास बाहेर पडली आहे. मुंबईकडे आता फक्त ६ सामने खेळायचे आहेत, त्यामुळे सलग सर्व सामने जिंकल्यास त्यांचे केवळ १२ गुण होतील.

मुंबई इंडियन्ससाठी १२ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणे खूप अवघड आहे, कारण आयपीएलच्या इतिहासात संघ किमान १४ गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. १४ गुणानंतरही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा असून नेट-रनरेटचा खेळ आहे.

पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सनंतर चेन्नई सुपर किंग्जची स्थिती खराब आहे, ज्यांनी ७ पैकी दोन सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे ४ गुण आहेत, जर सीएसकेने त्यांचे उर्वरित सर्व सामने जिंकले तर त्यांची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता निर्माण होईल.

आतापर्यंतच्या पॉइंट टेबलनुसार प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद, लखनौ सुपर जायंट्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात स्पर्धा आहे. हे संघ अव्वल ५ मध्ये आहेत आणि त्यांचे १० पेक्षा जास्त गुण आहेत.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now