शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४६ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी(Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Can Eknath Shinde sit as Shiv Sena chief?)
एकनाथ शिंदे यांनी ४६ बंडखोर आमदारांना सोबत घेऊन नवा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुखपदी बसू शकतात का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांना अनेक अडचणी येऊ शकतात.
प्रत्येक पक्षाचा कारभार काही नियमांनुसार चालत असतो. शिवसेना पक्षामध्ये ‘शिवसेना प्रमुख’ हे पद सर्वोच्च आहे. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला पक्षातून काढण्याचा अधिकार हा फक्त शिवसेना प्रमुखाला आहे. पण शिवसेना प्रमुखाला यासाठी कार्यकारिणी समितीच्या सदस्यांचा पाठिंबा मिळवावा लागतो.
सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना प्रमुखपद आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या हा अधिकार आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुखपद मिळणं जवळजवळ अशक्य आहे. कारण शिवसेना प्रमुख हे पद पक्षाचे प्रतिनिधी निवडून देतात. या प्रतिनिधींमध्ये आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख तसेच इतर पदाधिकारी असतात.
शिवसेना प्रमुख पदासाठी या सर्व पदाधिकारांचा पाठिंबा मिळवावा लागतो. २८२ प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांची २०१८ साली शिवसेना प्रमुखपदी निवड केली होती. शिवसेना प्रमुखांसोबत काम करणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीमध्ये एकूण १४ सदस्य असतात. यामधील फक्त ५ सदस्यांची निवड शिवसेना प्रमुखपदी बसलेली व्यक्ती करू शकते.
या १४ सदस्यांचा ‘पक्ष नेते’ म्हणून उल्लेख केला जातो. २०१८ मध्ये ९ सदस्यांची पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे या ९ सदस्यांमध्ये एकनाथ शिंदे यांची निवड झाली नाही. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना सर्व प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवता आला नाही. २०१८ मध्ये आदित्य ठाकरे यांची ‘पक्ष नेते’ म्हणून निवड झाली होती.
त्यामुळे एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुखपद मिळवायचे असल्यास या २५० पेक्षा जास्त प्रतिनिधींचा पाठिंबा मिळवावा लागेल. तसेच प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना प्रमुखपदी निवड करावी लागेल. या सर्व गोष्टी पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना शिवसेना प्रमुखपदी बसता येणार आहे. यामध्ये त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘या’ कारने भारतात गाडले यशाचे झेंडे, पार केला १ लाख कार्सच्या विक्रीचा टप्पा, वाचा किंमत अन् फिचर्स
”जर अग्निवीरांना ४ वर्षांनी पेन्शन मिळणार नसेल तर मीसुद्धा पेन्शन सोडायला तयार”
धोका मित्रपक्षाने दिला तर समजू शकतो पण…, आदित्य ठाकरे जिल्हाप्रमुखांना काय काय म्हणाले?