पुजेसाठीच नाही तर आरोग्यसाठीही फायदेशीर आहे विषाणू नष्ट करणारा कापूर

कापूरचा वापर घरातील पूजापाठसाठी केला जातो. कापूर किंवा कापूचे तेल केसांसाठी आणि त्वचेच्या रोगांसाठी खुप चांगले मानले जाते. हे जळलेल्या किंवा जखमेची खुन नष्ट करण्यासाठी सुध्दा मदत करते. आयुर्वेदात कापूरचा प्रयोग जास्त केला जातो. कापूर प्रत्येक घरात सहज उपलब्ध होते यासाठी तुम्ही कपूरचा वापर सहज करु शकता. जाणुन घ्या कापूरचे फायदे.

त्वचेवर कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले असेल तर ती जागा कापराने स्वच्छ केल्यास फायदा होतो. तसेच कापराच्या धुराने इन्फेक्शन दुर होऊ शकते. त्वचेसाठी कापूर खूप फायदेशीर आहे. कापूर कोशिकांना मजबूत करतो. त्यामुळे त्वचा तजेलदार होते.

कापूर, ओवा आणि पेपरमिंट एक सारख्या प्रमाणात घ्या. त्यांना एका काजेच्या बाटली टाका. त्या बाटलीला उन्हात ठेवा. थोड्या वेळाने ती बाटली हलवत जा. त्यानंतर त्यातील चार थेंब बत्ताशावर किंवा साखरेच्या सरबतात टाका. हे जुलाब झालेल्या व्यक्तीला द्या. जुलाब थांबतील.

टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्यासाठी कोमट पाण्यात थोडा कापूर आणि मीठ टाकून त्या पाण्यात पाय ठेवावा. पोटात दुखत असेल अशावेळी कापूर,ओवा आणि पेपरमिंट साखरेच्या सरबतात टाकल्यास पोट दुखी नाहिशी होते.

स्नायूतील दुखणे कमी करण्यात कापूरची मदत होते. स्नायू किंवा संधीवातचा आजार असल्यास कापूरचे तेलाने मालीश करा. आराम मिळू शकतो आणि दुखणे पळून जाते.

खाज आल्यास कापुराचा उपयोग करा. खाज आलेल्या ठिकाणी कापूर लावा, खाज बंद होते. तसेच खोबऱ्याच्या तेलात कापूर टाकून चांगले मिश्रण तयार करा आणि खाज झालेल्या जागेवर करा.

संधिवातात रुग्णाला कापूर खूप फायदेशीर आहे. संधिवात कापूरच्या तेलाची मालिश केल्यास आराम मिळतो. भाजल्यास कापूरचे तेल लावा. जळले किंवा भाजल्यास कापूराचं तेल खूप उपयोगी आहे. त्याने आग कमी होते.

कापूर खूप सुगंधी असते त्याचे सुवास आणि रसायनिक भिन्नता ही देशात होणाऱ्या वृक्षावर अवलंबून असते. कापुराच्या धुराने वातावरण प्रसन्न आणि अल्लाददायक होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.