कॅमेरा सुरूच होता आणि आलिया भट्टच्या खोलीत विना शर्ट दिसला रणबीर कपूर, विडिओ व्हायरल

मुंबई । बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या ३ वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक ठिकाणी ते दोघे एकत्र दिसतात. परदेशात देखील एकत्र फिरायला जातात. आता त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची खूप उत्सुकता लागली आहे.

याबाबत एकदा रणबीर कपूरने सांगितले होते की, कोरोना नसता तर आता त्यांचे लग्न झाले असते. यामुळे ते दोघे लग्न करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे ते दोघे घरी आहेत. सध्या अनेक कलाकार सोशल मीडियावर लाईव्ह सेशन मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

यातच बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट देखील चाहत्यांसोबत लाईव्ह सेशनवर बोलत होती. तेव्हा ती काय बोलत आहे यापेक्षा प्रेक्षकांचे लक्ष तिच्या आजूबाजूला जास्त होते. अशातच प्रेक्षकांना तिच्या रूममध्ये रणबीर कपूर दिसला. यावरून सगळे तिला कमेंट करून विचारत आहेत. आलिया भट्ट जेव्हा तिचे प्राणी प्रेम आणि निसर्ग प्रेमाबद्दल बोलत असते.

यावेळी तिथे तिच्यामागे असणाऱ्या आरश्यामध्ये रणबीर कपूरची प्रतिकृती दिसते. यामुळे आता आलियाच्या चाहत्यांचे असे म्हणणे आहे की, तो रणबीर कपूर होता. यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. आलिया आणि रणबीरने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. सगळेजण आता त्यांच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

या विडिओमध्ये त्याच्याकडे बघून देखील असे वाटत आहे की, तो रणबीर कपूरच आहे. यामध्ये त्याने शर्ट घातलेला नाही, यामुळे अलियाच्या एका चाहत्याने कमेंट केली की, ‘तो बघ मागे रणबीर कपूर विना शर्ट आहे.

सध्या या व्हिडिओवर अनेकजण मजेशीर कमेंट करताना दिसत आहेत. यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिया आणि रणबीर कपूर गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र आहेत.

ताज्या बातम्या

कोरोनाने आधी खासदाराला हिरावले, अन् आता २ मुलांचा घेतला जीव; अख्ख कुटूंबच झालं उध्दवस्त

प्रेमात वेडा झालेला १९ वर्षाचा मुलगा चढला टॉवरवर, लग्न कर नाही तर उडी घेईल; तरुणीला दिली धमकी

नांदेडमधील गुरुद्वारा कमिटीचा मोठा निर्णय! सोनं मोडून दवाखाने, मेडिकल कॉलेज उभारणार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.