अजबच परंपरा! आवडता जोडीदार मिळेपर्यंत तरुणी बनवू शकतात तरुणांसोबत शारीरिक संबंध; हा समाज देतो मान्यता

भारताप्रमाणेच अनेक देशांमध्ये ज्यांच्या त्यांच्या चाली रूढी परंपरा असतात. या रूढी परंपराच शतकानुशतके चाललेल्या असतात. काही परंपरा इतक्या कठोर असतात की त्यांच पालन आगामी पिढीला करताना नाकी नऊ येतात.

काही रूढी अशा असतात ज्यावर विश्वास ठेवणं कठीण असते. अशीच एक परंपरा कंबोडियामध्ये घडते. ही प्रथा कंबोडियाच्या केरुंग समुदायाच्या लोकांमध्ये आहे. ही प्रथा मुलींसाठी असून यामध्ये मुलींची मासिक पाळी सुरू होताच, म्हणजेच मुली १३ ते १४ वयोगटात आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतंत्र झोपड्या तयार केल्या जातात.

तेथील लोक त्या झोपड्यांना लव्ह- हट असे म्हणतात. येथील कुटुंबातील सदस्य मुलीला तिच्या आवडीच्या जीवनसाथीची निवड करण्यासाठी मुलांशी संबंध ठेवण्यास प्रोत्साहित करतात. जोपर्यंत मुलीला पतीच्या रुपात आवडता असा मुलगा मिळत नाही, तोपर्यंत ती इतर लोकांशी लैंगिक संबंध ठेवण्याची सुट दिली जाते.

सर्वात विशिष्ट गोष्ट म्हणजे या समाजाच्या मुलींना दुसऱ्या पुरुषांशी संबंध ठेवण्यास कोणतीच अडचण वाटत नाही. या परंपरेबद्दल त्या अतिशय उत्साही आणि आनंदी असतात. त्यांच अस म्हणणं आहे की, लव्ह- हटमुळे त्यांना त्यांचा जोडीदार पारखण्यास मिळतो.

जोडीदारांमध्ये काय हवे काय नको हे सुद्धा लग्नाआधीच समजते. या समाजाच्या या परंपरेवर एका अहवालात सुद्धा लिहिले गेले आहे. ज्या लोकांसोबत मुली संबंध बनवतात, जर त्यांच्यापैकी कोणी एक जीवनसाथीच्या रुपात आवडत असेल तर ते लोक आनंदाने त्याच्याशी लग्न करतात.

यामुळे इतर मुलांना दु:ख होत नाही. जो जीवनसाथी आवडला आहे त्याच्यासोबत आनंदाने लग्न लावून दिलं जातं.

 

महत्वाच्या बातम्या
गांजाच्या शॉपमध्ये चोरी करण्याचा प्लॅन होता चोरांचा, एकट्या कर्मचाऱ्याने तिघांना लावले पळवून; पहा थरारक व्हिडिओ
माणूस समोर गेला की मनोहरमामा त्याची संपूर्ण माहिती कसं काय सांगायचा? बिंग फुटले
चोराच्या उलट्या बोंबा! साहील खान म्हणतोय की मनोज पाटील नकली स्टेराॅईड विकायचा
आजींचे वय ७५ पण जोश २५ चा! नागपुरच्या या आजींचे फाफडे आहेत जगप्रसिद्ध, जातात अमेरिकेपर्यंत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.