बुलाती है मगर जानेका नहीं…फेम शायर राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे दुःखद निधन

दिल्ली | प्रख्यात उर्दू कवी लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचं कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. इंदौरी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

इंदूरमधील लोकप्रिय शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. खुद्द राहत इंदौरी यांनी सकाळी ट्विट करून ही माहिती दिली होती. त्यांची ही अखेरची ट्विट ठरली आहे.

“अचानक लक्षणे जाणवू लागल्याने सोमवारी जाऊन कोरोनाची चाचणी केली होती. आता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे”, असं इंदौरी यांनी ट्विट केले होते.

“तसंच मी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे त्यामुळे एक विनंती आहे की, माझ्या घरी फोन करू नका. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या तब्येतीबद्दल मी ट्विटर आणि फेसबुकवर माहिती देत राहील”, असं भावनिक आवाहनही त्यांनी केले होते.

परंतु ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन एक दिवस उलटला आणि त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या बातमीमुळे सगळीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.