परेदशातून ७ लाख रुपये देऊन कॉलगर्ल बोलावणे पडले महागात; घडली धक्कादायक घटना

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून अनेक लोकांचा कोरोनामुळे मृत्यु होत आहे. अशातच एक धक्कदायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

उत्तर प्रदेशच्या एका व्यापाऱ्याच्या मुलाने ७ लाख रुपये खर्च करुन थायलंडवरुन कॉलगर्ल बोलावली होती. पण लखनऊला आल्यानंतर फक्त दोनच दिवसात तिला कोरोनाची लागण झाल्यामुळे तिचा मृत्यु झाला आहे.

लखनऊच्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याच्या मुलाने थायलंडवरुन ७ लाख रुपये खर्च करुन कॉलगर्लला बोलवले होते. तिला १० दिवसांपुर्वी बोलवले होते. पण लखनऊमध्ये येताच तिला कोरोनाची लागण झाली होती.

लखनऊला आल्यानंतर ती दोनच दिवसात आजारी पडली होती. त्यानंतर त्यामुलाने याबाबतची माहिती थायलंडच्या एम्बेसीला दिली. त्यानंतर एम्बेसीच्या हस्तक्षेपानंतर तिला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान ३ मे रोजी तिचा मृत्यु झाला आहे.

कॉलगर्लच्या मृत्युनंतर तिचे मृतदेह विभुतीखंड पोलिसांना देण्यात आले. पोलिसांनी थायलंडच्या एम्बेसी यांना आणि तिच्या नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ नाही शकला. त्यामुळे पोलिसांनीच त्या तरुणीवर अंत्यसंस्कार केले आहे.

दरम्यान, कॉलगर्लच्या मृत्युनंतर पोलिस याप्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. तसेच सेक्स रॅकेट सापडण्याची आशंकाही व्यक्त केली जात आहे. थायलंडवरुन भारतात आलेल्या कॉलगर्लच्या संपर्कात आलेल्या लोकांचा पोलिस शोध घेत आहे. राजस्थानच्या एका ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून ती लखनऊला आली होती, असे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

गरम पाणी प्यायल्याने कोरोनापासून बचाव होतो? केंद्र सरकारने दिली वेगळीच माहिती..
एकेकाळी स्कुटरवर सामान विकायचे दोघे मित्र, आता १ लाख करोड रूपयांना विकली गेली त्यांची कंपनी
‘आई कुठ काय करते’ मालिकेत पार पडला अनघा आणि अभिचा साखरपुडा; पहा खास क्षणाचे फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.