ज्या तुकाराम मुंढेंचा भर सभागृहात अपमान केला त्यांनाच पुन्हा बोलवण्याची मागणी

नागपूर । कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.नागपूरमध्ये परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण याठिकाणी सापडत आहेत. यावर काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांनी विभागीय कार्यालयात प्रचंड गोंधळ घातला. यावेळी, तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात आणा, अशी मागणीही त्यांनी केली.

यावेळी ते म्हणाले, तुकाराम मुंढे यांच्यासारखे खमके अधिकारी असल्याशिवाय सरकारी अधिकारी सुधारणार नाहीत. काँग्रेस नेत्याने केलेल्या या वक्तव्यामुळे आता चर्चा रंगू लागली आहे. विशेष म्हणजे याच सभागृहात त्यांचा अपमान करण्यात आला होता.

गेल्यावर्षी कोरोना काळात येथे तुकाराम मुंढे हे नागपूरचे आयुक्त होते. या काळात त्यांनी केलेल्या कामामुळे कोरोनाला आळा घालण्यात नागपूरकरांनी मोठे यश मिळवले होते. यामुळे कोरोना आटोक्यात आला होता.

केविड सेंटरला भेट देणे, रस्त्यावर उतरुन कामाची पाहणी करणे, प्रसंगी कारवाई करणे असे त्यांचे काम सुरूच होते. मात्र त्यांचे आणि भाजप नेत्यांचे बिनसले आणि त्यांची तक्रार दिल्लीपर्यंत गेली आणि त्यांची बदली झाली.

आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूरकरांना तुकाराम मुंढेंची आठवण झाली. तुकाराम मुंढेंची बदली झाली तेव्हा नागपूरकर एकत्र येऊन त्यांनी या बदलीला विरोध केला होता.

आता बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात मोठा गोंधळ घातला. यावेळी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांवर आरडाओरडा करत ‘यांना जाळून टाकू’, अशी धमकीही दिली. यामुळे आता त्यांनाही मुंढेंची आठवण आली.

ताज्या बातम्या

स्वत:च्या व पाच जणांच्या लसीचे पैसे सीएम फंडात देणार; जयंत पाटलांच्या मुलाचा भारी निर्णय

शोलेच्या शुटींग वेळी अमिताभ धर्मेंद्रसोबत बोलायचं दूर त्यांच्याकडे बघतही नव्हते; कारण..

कोरोना लस किती कालावधीपर्यंत सुरक्षा देऊ शकते, वाचा संशोधक काय म्हणतात…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.