से*क्स करताना जोडीदाराच्या परवानगीशिवाय कंडोम काढता येणार नाही; ‘या’ सरकारचा मोठा निर्णय

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याने एक अतिशय विचित्र नियम लागू केला आहे. पार्टनरच्या संमतीशिवाय शारीरिक संबंधादरम्यान जर कंडोम वापरला गेला तर असे केल्यामुळे कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते असा निर्णय येथील सरकारने घेतला आहे.

कॅलिफोर्निय सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे एकच गोंधळ उडाला आहे. या नियमाबाबत येथे बराच काळ चर्चा चालू होत्या, परंतु आता हा नियम बनवला जाणार आहे आणि लवकरच त्याचा मसुदा पास होणार आहे.

इंडिपेंडंटच्या एका अहवालानुसार, कॅलिफोर्निया हे असा कायदा करणारे अमेरिकेतील पहिले राज्य ठरेल. कॅलिफोर्नियाच्या आमदारांनी ७ ऑगस्ट रोजी राज्यपाल गेविन न्यूसम यांना हे बिल पाठवले. आता हा कायदा लागू करण्याची प्रक्रिया पुढे गेली आहे. या कायद्यासाठी फौजदारी संहितेत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. जरी हे विधेयक कॅलिफोर्निया विधानसभेच्या सदस्याने फार पूर्वी सादर केले असले तरी आता त्यावर सहमती झाली आहे.

या कायद्यानुसार, पीडित व्यक्तीच पहिले पाऊल उचलेल आणि तो आरोपीविरोधात संमतीशिवाय असे केल्याबद्दल आणि भावनिक किंवा शारीरिक जबरदस्ती केल्याबद्दल खटला दाखल करू शकतो.

तसेच यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की पार्टनरशी शारीरिक संबंध ठेवताना संमतीशिवाय कंडोम काढून टाकणे बेकायदेशीर ठरवले जाईल. या कायद्याच्या मदतीने, पीडिताला हानीचा दावा करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

या कायद्याबद्दल बोलताना तज्ञ म्हणाले, की संबंध ठेवताना कोणीतरी कंडोम गुपचुप किंवा माहिती न देता काढून टाकल्याने अनेक धोके निर्माण होऊ शकतात. हे केवळ एखाद्याची फसवणूकच नाही तर पीडितांना गर्भधारणा, लैंगिक संक्रमित संक्रमण आणि भावनिक आघात यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

काही काळापूर्वी, कोलंबिया जर्नल ऑफ जेंडर अँड लॉ वर लिहिलेल्या लेखात तज्ञांनी काय हानी होऊ शकते याची सविस्तर माहिती दिली आहे. पण सध्या हा नियम पुन्हा एकदा जगभर चर्चेचा विषय बनला आहे. हा कायदा लागू केल्यानंतर असा कायदा लागू करणारे कॅलिफोर्निया फक्त अमेरिकेचेच नव्हे तर संपूर्ण जगातले पहिले राज्य बनणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए….’ निकालानंतर छगन भुजबळांचा शायराना अंदाज
काहीही झालं तरी पाचव्या सामन्यात ‘या’ खेळाडूला बाहेर बसवू नका; गावस्करांचा टिम इंडीयाला सल्ला
८ वर्षांचा चिमुरडा अंध आई वडिलांसाठी बनला श्रावणबाळ! ऑटोरिक्षा चालवून करतोय कुटुंबाचा सांभाळ..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.