हजारो कोटींचा मालक कसा झाला कर्जबाजारी, नंतर नदीपात्रात सापडला होता त्याचा मृतदेह

कॅफे कॉफी डेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी मालविका हेगडे यांना तातडीने प्रभावीपणे कंपनीचे सीईओ म्हणून नियुक्त केले गेले होते. व्हीजी सिद्धार्थ यांचा मृतदेह २०१९ वर्षी मंगळुरू येथे एका नदीमध्ये सापडला होता.

त्यांनी आत्महत्या केली होती असा अंदाज लावला गेला होता. आज आपण त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. त्यांनी ज्या पद्धतीने यशाच्या पायऱ्या चढल्या होत्या त्याच पद्धतीने त्यांच्यावर संकटेही खुप आली होती.

बंगळुरूच्या ब्रिगेड रोडवर जुलै १९९६ मध्ये कॅफे कॉफी डेची सुरुवात झाली. पहिले कॉफी शॉप इंटरनेट कॅफे म्हणून उघडले. त्या दिवसांमध्ये इंटरनेटचा नवीनच शोध भारतात लागला होता. इंटरनेटसह कॉफीची मजा नवीन काळातील लोकांसाठी एक वेगळा अनुभव होता.

कमर्शियल इंटरनेटने आपले पाय पसरण्यास सुरवात करताच सीसीडीने कॉफीच्या मूळ व्यवसायालाच पुढे चालवण्यास सुरूवात केली आणि कॉफी कॅफे म्हणून देशभरात व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या ५ वर्षात काही कॅफे उघडल्यानंतर सीसीडी आज देशातील सर्वात मोठी कॉफी रिटेल चेन बनली आहे.

सध्या सीसीडीकडे देशातील २४७ शहरांमध्ये एकूण १ हजार ७५८ कॅफे आहेत. कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही.जी. सिद्धार्थ एका अशा कुटूंबाशी नाते होते ज्यांची कॉफीची लागवड करणे १५० वर्ष जुनी संस्कृती आहे. त्यांच्या कुटुंबात कॉफीची लागवड केली जायची ज्यात महाग कॉफी पिकविली जात होती.

हे त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरले. हाच नंतर त्यांच्या कुटुंबासाठी व्यवसाय बनला. ९० च्या दशकात कॉफी शक्यतो दक्षिण भारतात सेवन केली जात असे आणि पंचतारांकित हॉटेल्समध्येच ती भेटायची. सिद्धार्थ यांना कॉफी सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायची होती.

कॅफे कॉफी डे सुरू होण्याचे कारण म्हणजे सिद्धार्थ यांचे स्वप्न आणि कुटुंबाच्या कॉफी व्यवसायाबद्दल सखोल समज. सिद्धार्थ यांच्या वडिलांनी त्यांना कॉफीचा व्यवसाय करण्यासाठी ५ लाख रुपये दिले. त्यांनी असेही म्हटले होते की जर ते या व्यवसायात अयशस्वी झाले तर त्यांना आपल्या कौटुंबिक व्यवसायात परत हातभार लावावा लागेल.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की आज सीसीडी कंपनीची एकूण संपत्ती ४ हजार कोटींपेक्षा जास्त आहे. माईंडट्रीचे सर्वात मोठे शेअर होल्डर व्ही.जी. सिद्धार्थ जे कॅफे कॉफी डेचे संस्थापकसुद्धा होते. पण येथून त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या.

त्यांनी माईंडट्रीची जेव्हा स्थापना झाली त्याच वर्षी त्यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आणि हळूहळू २१ टक्क्यापर्यंत ही गुंतवणूक वाढवली. मिंटच्या वृत्तानुसार, या दिवसात सिद्धार्थ यांचे दिवस खुप वाईट चालले होते. ते नैराश्यात गेले होते.

त्यांच्यावर आयकर विभागाचे ३०० करोड रूपयांचे कर्ज होते आणि त्यांची गुंतवणूक कंपनी सिवन सिक्युरिटीज कर्जामध्ये बुडाली होती. यामुळेच अडचणींवर मात करण्यासाठी सिद्धार्थ माईंडट्रीमधील आपला हिस्सा विकण्यास तयार झाले होते.

त्यांच्यावर आणखीही बरेच कर्ज होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज लावण्यात येत होता. त्यांच्यानंतर त्यांची पत्नी मालविका हेगडे यांना सगळा पदभार सोपविण्यात आला होता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
एकेकाळी कट्टर शिवसैनिक असलेले नारायण राणेंनी शिवसेना का सोडली? वाचा त्यांची राजकीय कारकीर्द
सर्व पुरुष असेच असतात का? घरातील ‘ते’ खाजगी फोटो शेअर करत शाहीद कपूरच्या पत्नीचा प्रश्न; पहा फोटो..
कॅन्सरमुळे खुपच खराब झाल्या आहेत किरण खेर; पहिल्यांदाच समोर आले उपचार सुरु असतानाचे फोटो
भाड्याने पंडित देण्याचा सुरू केला बिजनेस, दरवर्षी कमावतात ७० कोटी रूपये

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.