कार खरेदी करायचीय? जाणून घ्या भारतातील सद्याच्या टाॅप टेन कार

सध्या सणासूदीचा काळ आहे. यावेळी लोकांकडून अनेक वस्तू खरेदी केल्या जातात. दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर कुटुंबासाठी प्रत्येक जण काही ना काही खरेदी करत असतो.

सध्या फॅमिलीसाठी कार खरेदी करताना अनेकजण दिसत आहेत. गेल्या महिन्यात देशभरात या 10 एमपीवीची सर्वात जास्त विक्री झाली आहे. त्यावरून फॅमिली कार खरेदी करतानाचा कल दिसून येत आहे.

जर चांगल्या कार खरेदी करायच्या असतील तर Toyota Innova Crysta ही देशात सर्वात जास्त विक्री होणारी दुसऱ्या क्रमांकाची गाडी ठरली आहे. सप्टेंबरमध्ये Toyota Innova Crysta च्या 4,087 गाड्यांची विक्री झाली आहे. तर मागील वर्षी हीच विक्री 4,225 इतकी होती.

Maruti Ertiga मारुती सुझुकीची ही गाडी सर्वात जास्त विक्री होणारी गाडी ठरली आहे. सप्टेंबर महिन्यात 9,982 गाड्यांची विक्री झाली आहे. तर 2019 मध्ये मागील वर्षी या गाडीची फक्त 6,284 गाड्यांची विक्री झाली होती.

Kia Carnival किया मोटर्सने अलीकडे सोनेट लाँच करून ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे. सप्टेंबर महिन्यात Kia Carnival च्या 331 गाड्यांची विक्री झाली आहे. यामुळे या गाडीचा देखील एक चांगला पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.

Mahindra Xylo ही एक फॅमिली कार आपल्यासमोर आहे. कोणत्याही प्रकारच्या रोडवर ही गाडी टिकू शकते. मागील वर्षी या 55 गाड्यांची विक्री झाली होती.

Toyota Vellfire ही गाडी किमतीने महाग असली तरी ही गाडी मजबूत आहे. मोठ्या प्रवासाला ही गाडी आरामदायक आहे. तब्बल 600 टक्क्याने या गाड्यांची विक्री वाढली आहे. यामुळे ही गाडी देखील एक चांगला पर्याय आपल्यासमोर आहे.

यामुळे आता आपल्याला कार खरेदी करायची असेल तर आपल्यासमोर अनेक पर्याय आहेत. तसेच या काळात यावर मोठ्या प्रमाणावर ऑफर देखील दिल्या जातात. यामुळे या संधीचा फायदा घ्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.