हेमामालिनीने एक चुगलीमुळे धर्मेंद्रने गोविंदाच्या कानाखाली वाजवली होती; जाणून घ्या पुर्ण किस्सा..

बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्यांचे भांडण होतात. पण काही वेळेस ही भांडण खुप जास्त वाढतात. कधी कधी तर ही भांडण अनेक वर्षे सुरू राहतात. अशी अनेक भांडण बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका भांडणाबद्दल जाणून घेणार आहोत.

हा किस्सा आहे ८० च्या दशकातील. तेव्हा अनेक नवीन चेहरे बॉलीवूडमध्ये आले होते. अनेकांना इथे यश मिळाले होते. तर अनेक जण अजूनही प्रयत्न करत होते. असेच दोन नवीन चेहरे म्हणजे अनिल कपूर आणि गोविंदा.

हे दोघेही आज बॉलीवूडचे सर्वात मोठे सुपरस्टार आहेत. पण एककाळ असा होता ज्यावेळी हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र नव्हते. त्या दोघांना एकमेकांची चेहरे बघायला आवडत नव्हते. म्हणून एका चित्रपटाच्या शुटिंगसाठी या दोघांनी चार वर्षे लावली.
जाणून घेऊया पुर्ण किस्सा.

हेमा मालिनीला बॉलीवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखले जाते. त्यांनी बॉलीवूडच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या सुंदरतेचे आणि अभिनयाचे अनेक चाहते आहेत. म्हणून आजही त्यांना मोठ्या पद्यावर पाहण्यासाठी अनेक जण वाट बघत असतात.

८० च्या दशकात त्यांनी स्वतः ची निर्मिती कंपनी सुरू केली होती. या प्रोडक्शन हाऊसमध्ये त्यांनी एका चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाचे नाव होते ‘आवारगी’. या चित्रपटासाठी त्या खुप मेहनत घेत होत्या.

या चित्रपटाकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांनी या चित्रपटाची कास्ट ठरवली होती. या चित्रपटात अनिल कपूर, गोविंदा आणि मिनाक्षी शेषाद्री मुख्य भुमिकेत होत्या. हेमा मालिनी यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करण्याची संधी मिळाली ही त्यांच्यासाठी खुप मोठी गोष्ट होती.

या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करायची होती. अनिल कपूर आणि मिनाक्षी यांनी शुटिंगसाठी वेळ दिला होता. पण गोविंदा मात्र या चित्रपटाला वेळ देत नव्हते. त्यामूळे या चित्रपटाच्या टिमसाठी खुप अडचणी निर्माण होत होत्या.

गोविंदा आणिअनिल कपूर या दोघांमध्ये खास मैत्री नव्हती. हे दोघेही एकमेकांचे स्पर्धक होते. म्हणून अनेकदा या दोघांमध्ये वाद व्हायचे. गोविंदाला अनिल कपूरसोबत काम करण्याची इच्छा नव्हती. म्हणून ते शुटिंग टाळत होते.

गोविंदाला जेव्हा पण या चित्रपटासाठी वेळ मागितला जायचा. तेव्हा ते वेळ नाही असे सांगायचा किंवा थोड्या दिवसांनी शुटिंग सुरू करू असे सांगायचे. गोविंदा त्यावेळी नवीन होते. तरीही एवढे व्यस्त कसे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. शेवटी हेमा मालिनीने स्वतः गोविंदाला फोन केला आणि चित्रपटाची शुटिंग कधी सुरू करायची? असा प्रश्न विचारला.

त्यावेळी गोविंदाने सांगितले की, ‘मी एकसाथ खुप चित्रपट साइन केले आहेत. म्हणून माझ्याकडे वेळ नाही. मी लवकरच शुटिंगसाठी वेळ काढेल’. त्यांनी अनिल कपूर आणि त्यांच्या भांडणाबद्दल काहीही सांगितले नाही. हे सगळं ऐकून हेमा मालिनी चिडल्या आणि त्यांनी या गोष्टीची तक्रार धर्मेंद्र यांच्याकडे केली.

मग काय धरम पाजीने गोविंदाला घरी भेटण्यासाठी बोलावले. असे बोलले जाते की, ज्यावेळी गोविंदा धर्मेंद्रच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी या दोघांमध्ये वाद झाले होते. एवढेच नाही तर धर्मेंद्र आणि गोविंदामध्ये हातापायी देखील झाली होती.

धर्मेंद्र यांनी गोविंदाच्या कानाखाली वाजवली आणि सांगितले की, ‘हेमा मालिनी यांच्यासाठी हा चित्रपट खुप महत्त्वाचा आहे. त्यामूळे लवकरात लवकर या चित्रपटाची शुटिंग सुरू कर. जर चित्रपट करायचा नसेल तर मग तसे सांग. हेमा मालिनीसोबत काम करण्यासाठी अभिनेते एका पायावर उभे आहेत’.

हे ऐकल्यानंतर गोविंदाला त्यांची चुक लक्षात आली. त्यांनी धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची माफी मागितली आणि दोन दिवसात चित्रपटाची शुटिंग सुरू केली. या सर्व कारणांमुळे हा चित्रपट चार वर्षे उशिरा रिलीज झाला होता. या चित्रपटानंतर त्यांनी परत कधी हेमा मालिनीसोबत काम केले नाही.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला होता. गोविंदाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘आवारगी चित्रपट खुप खास होता. कारण त्या एका चित्रपटासाठी त्यांनी तीन चित्रपट नाकारले आणि या चित्रपटाची शुटिंग पुर्ण केली. कारण निर्माते खुप शिस्तप्रिय होते.’

महत्त्वाच्या बातम्या –

एखाद्या चित्रपटाच्या फिल्मी स्टोरीप्रमाणे ‘या’ अभिनेत्याचे कुटुंब एका रात्रीत संपले

म्हणून शक्तीमान मुकेश खन्नांनी अजूनही नाही केले लग्न! सांगीतले धक्कादायक कारण

फेमस काॅमेडीयन राजू श्रीवास्तवला काम मिळणेही बंद झाले यामागे आहे हे धक्कादायक कारण

टिव्हीवरची छोटी काॅमेडीयन गंगुबाई आठवतीय? आता इतकी सुंदर दिसतेय की विश्वास बसनार नाही

विराट कोहलीचा मराठमोळ्या लावणीवर ठेका; पहा भन्नाट व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.