दिलीपकुमार, राजेश खन्नाची नक्कल करत पेन विकायचे जॉनी लिव्हर; लाईफला मिळाला असा टर्न की..

जॉनी लिव्हर बॉलीवूडचे कॉमेडी किंग म्हणून ओळखले जातात. बॉलीवूडमध्ये कादर खान, मेहमूद हे विनोदी कलाकार होते. याच विनोदी कलाकारांची परंपरा पुढे सुरु ठेवण्याचे काम जॉनी लिव्हर यांनी केले आहे.

जॉनी लिव्हर आजही बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये कॉमेडी करताना दिसतात. पण त्यांच्या कॉमेडीला कोणीही टक्कर देऊ शकत नाही. जॉनी लिव्हरप्रमाणेच त्यांची मुलगी जिम्मी देखील एक उत्तम दर्जाची कॉमेडीयन आहे.

आज फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक विनोदी चित्रपट बनतात. पण या चित्रपटांमध्ये ते विनोद नसतात. आजकालचे सर्व विनोद हसण्यासारखे नसतातच.

पण एकेकाळी बॉलीवूडमध्ये अनेक विनोदी चित्रपट आले होते. त्या सर्व चित्रपटांनी लोकांना खुप जास्त हसवले होते आणि हसता हसताच रडवले होते.

९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये खुप सिनेमे आले. त्यातले काही निखळ मनोरंजन करणारे होते. या सिनेमांनी आपल्याला कॉमेडीचे बादशाह जॉनी लिव्हर दिले.

हा किस्सा आहे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांच्या नावाचा. चला तर मग जाणून घेवूया जॉन प्रकाश राव जानूमाला बॉलीवूडचे जॉनी लिव्हर कसे झाले.

जॉनी यांना लहानपणापासूनच विनोदाची खुप आवडी होती. त्यांना मेहमूद आणि जॉन वॉकर यांचे विनोद खुप आवडायचे. त्यामूळे त्यांना आपण मोठे झाल्यानंतर कॉमेडीयन व्हावे असे वाटायचे.

पण त्यांची घरची आर्थिक परिस्थिती खुप खराब होती. त्यामूळे त्यांचे स्वप्न पुर्ण होण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. त्यांच्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती.

ते लहानपणी पेन विकायचे. त्यांच्या या पेनाचे ग्राहक खुप मोठे कलाकार असायचे. त्यामूळे पेन विकल्या जायच्या. कारण ते पेन विकताना दिलीप कुमार, राजेश खन्ना, धर्मेंद्र, अशा मोठमोठ्या अभिनेत्यांची नक्कल करायचे.

पण त्यांचा हा व्यवसाय जास्त दिवस टिकला नाही. मग त्यानंतर त्यांनी वडीलांसोबत युनिलिव्हरच्या कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. पण तिथे देखील त्यांनी नक्कल करायची सोडली नाही.

ते कंपनीतल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनोरंजन करायचे. त्यांना नक्कल करुन हसवायचे. त्यानंतर कंपनीमध्ये एक कार्यक्रम होता.

या कार्यक्रमामध्ये त्यांना विनोदाची पहीली संधी मिळाली. त्यांनी कंपनीतील सर्वांची नक्कल केली. ते नक्कल करायचे आणि ती नक्कल कोणाची आहे हे ओळखायला लावायचे.

त्यांच्या एका वरीष्ठ कर्मचाऱ्याने खुष होऊन म्हटले की, जॉनीने तो हिंदुस्तान लिव्हर के सबकी बँड बजादी, आजसे तेरा नाम जॉनी लिव्हर.’ तोपर्यंत त्याचे नाव जॉन प्रकाश राव जानुमाला होते.

या घटनेनंतर ते जॉनी लिव्हर म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी कॉमेडी शो करण्यास सुरुवात केली. त्यांना कल्याणजी आनंदजी ह्यांच्या म्युजीकल शो मध्ये काम करण्याची संधी मिळाली. एका कार्यक्रमात शो मधल्या मुलींना कपडे बदलायला वेळ लागणार होता.

आयोजकांना कळत नव्हते की काय करावे. आनंदजींना कल्पना सुचली आणि त्यांनी जॉनीला सांगितले की जा आणि हसव प्रेक्षकांना. पण ते सर्व प्रेक्षक बॉलीवूडमधून होते.

मग काय जॉनी यांनी कार्यक्रमाची पुर्ण माहोल बदलला. या कार्यक्रमानंतर त्यांना बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर मिळायला सुरुवात झाली आणि ते झाले बॉलीवूडचे कॉमेडी किंग जॉनी लिव्हर

त्यांची जोडी सर्वात जास्त कादर खान आणि गोविंदासोबत पसंत केले जाते. गोविंदाच्या अनेक चित्रपटांमध्ये जॉनी असायचे. गोविंदा त्यांना स्वतः भाऊ मानतात.

पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यात देखील ते तेवढेच चांगले मित्र आहेत. ९० च्या दशकात असा एकही सिनेमा नव्हता ज्यात जॉनी नाही. एकवेळेस सिनेमाची स्क्रिप्ट नंतर ठरवली जाई पण त्यात जॉनी असणार हे आधी ठरत असे.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.