गायीचं शेण ५ रूपये किलोने विकत घेणार; गडकरींची मोठी घोषणा

नागपुर |  केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्राझील देशातून गीर गाईचं वीर्य भारतात आणून त्यावर संशोधन सुरू असल्याचं म्हटलं आहे. त्याद्वारे देशात गायीच्या शेणापासून पेंट बनवला जाणार आहे. आणि शेतकऱ्यांना गाईच्या शेणापासून ५ रूपये प्रतिकिलो भाव मिळणार असल्याचं कार्यक्रमात बोलताना जाहिर केलं आहे. त्यामुळे याचा शेतकर्‍यांना फायदा होणार आहे.

गडकरी  म्हणाले की, प्रत्येक गावात गायीच्या शेणापासून पेंट बनवण्याची कंपनी असावी. त्यामुळे कृषी व्यवसायाला चालना मिळणार आहे. ज्याच्याकडे गाय व म्हशी आहेत ते शेतकरी महिन्याला शेणापासून आठ ते दहा हजार रूपये कमावू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्तपन्न मिळण्यास मदत होणार आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की,  जनावरं पालनाचा खर्च ज्याला परवडतं नाही त्याच्यासाठी ही आनंदीची गोष्ट आहे. सरकार शेतकऱ्यांना कृषी व्यवसायात पुढे घेऊन जाण्याच्या योजना आणत आहे.  शेती सोबतच गाय, म्हशी पालनातून चांगला फायदा मिळावा यासाठी गाय म्हशीच्या शेण, दुधापासून नवनवीन योजना राबवणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
मोदींच्या सख्ख्या पुतणीला भाजपनं तिकीट नाकारलं; वाचा का नाकारलं गेलं तिकीट?
शेतकऱ्याचा नादखुळा! शेतकरी उद्योजकाने खरेदी केले हेलिकॉप्टर…
शेतकऱ्यांना शेण आणि सेंद्रीय कचऱ्यापासून मिळणार पैसे; वाचा काय आहे सरकारची योजना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.