उद्योगपतीच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेला होती ५ लाखांची आॅफर, स्वत:च केले सर्व उघड

बॉलिवूड एक मायाजाल आहे. येथे दररोज वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्यातील काही आपल्याला समजतात तर काही घटना आपल्याला माहित पण होत नाहीत. चंकी पांडे यांनी त्यांच्या आयुष्यातील असाच एक किस्सा शेअर केला आहे.

त्यांच्यावर एका उद्योगपतीच्या लग्नात रडण्याचाही ऑफर आल्याची त्यांनी म्हटले आहे. चंकी पांडे यांनी मुंबई मिरर वृत्तपत्राला मुलाखत दिली आहे, त्यात त्यांनी या गोष्टीचा उलगडा केला आहे.

चंकी पांडे यांनी सांगितलेल्या घटनेनुसार २००९ साली त्यांच्याशी एका व्यक्तीने संपर्क केला होता. अंत्यसंस्काराच्या बाजूला उभे राहून रडण्याची त्यांना ऑफर देण्यात आली. त्यांना यावेळी रडण्यासाठी तब्बल ५ लाख रुपये मिळणार होते.

चंकी पांडे यांना पहिल्यांदा अशी ऑफर मिळाल्यानंतर काय करावे तेच कळेना. त्यानंतर त्यांनी खोलात जाऊन सदर घटनेची चौकशी केली तेव्हा त्यांना काही गोष्टी माहित झाल्या.

नातेवाईकांना असे दाखवायचे होते की मेलेल्या व्यक्तीचे बॉलिवूड मध्ये चांगले संबंध होते. मृत झालेल्या व्यक्तीने बॉलिवूड मध्ये पैसे गुंतवलेले होते असे लोकांना दाखवायचे होते.

यासाठी चंकी पांडेला ५ लाख रुपये मिळणार होते पण त्यांनी ही ऑफर धुडकावून लावली. चंकी पांडे यांनी यावे म्हणून मृत झालेल्या उद्योगपतींचे नातेवाईक खूप आग्रह करत होते. त्यांनी त्यांच्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्याला पाठवले मात्र त्यांनी यावेळी त्या दुसऱ्या अभिनेत्याचे नाव सांगितलेले नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.