राजकीय नेत्यांनी बिले थकवल्याने मुंबईतील केटरींग व्यावसायिकाची आत्महत्या; चिठ्ठीत बड्या नेत्यांची नावे

मुंबई । मुंबईमध्ये सध्या एक धक्कादायक घटना घडली आहे. चेंबूरनजीक राजकारणामुळे आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास करत आहेत. येथे एका कॅटरिंग व्यवसायिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

या व्यवसायिकांने चिठ्ठी लिहून ठेवली होती, यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीमध्ये काही लोकांची नावे लिहिली आहेत. या नावांमध्ये राजकीय नेत्यांनी नावे आहेत. यामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये बड्या नेत्यांची नावे असल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश राठोड असे आहे. त्यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ते देवनार, गोवंडी आणि चेंबूर अशा अनेक ठिकाणी जेवण पोहोचवतात.

असे असताना काही राजकीय नेत्यांनीही त्यांच्याकडून ऑर्डर घेतल्या होत्या. परंतु त्याचे पैसे दिले नाहीत. अनेकदा पैसे मागून देखील पैसे मिळत नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे त्यांच्यावर कर्ज वाढत गेले होते.

त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आत या चिठ्ठीत कोणती नावे आहेत, याबाबत अजून माहिती समोर आली नाही.

मुंबईत रोज अनेक आत्महत्येच्या धक्कादायक घटना समोर येत असतात. मात्र राजकीय नेत्यांनी या चिठ्ठीत नावे आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे मुंबईत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.