Share

Business Success Story : मुलीचं काम नाही म्हणणाऱ्यांना तरुणीचं उत्तर! मेहनतीनं उभा केलेला व्यवसाय, आज मिळवते महिन्याला लाखोंची कमाई

Business Success Story : ग्रामीण भागातील सकीना ठाकूर (Sakina Thakur Story) हिनं “हे मुलीचं काम नाही” म्हणत उपहास करणाऱ्यांना आपल्या कर्तृत्वातून जबरदस्त उत्तर दिलं आहे. इतिहास विषयात पदव्युत्तर होऊनही तिनं पारंपरिक नोकरी न करता गावातच स्वतःचा सकीना डेअरी फार्म (Sakina Dairy Farm) उभा केला. तुंगल खोऱ्यातील कुन गावात (Kun Village Himachal) सुरू केलेल्या या उपक्रमानं ती आज ग्रामीण महिलांसाठी आर्थिक स्वावलंबनाचं प्रतीक ठरली आहे. सुरुवातीला फक्त 1.25 लाखांची बचत आणि ग्रामीण बँकेचं थोडं कर्ज एवढ्यावर आधारलेल्या तिच्या धडपडीचं रूपांतर आज सुमारे दोन लाखांच्या मासिक उत्पन्नात झालं आहे.

शिकलेली मुलगी पशुधन सांभाळणार, डेअरी चालवणार? असं म्हणत अनेकांनी सकीना ठाकूर (Sakina Thakur Farmer) हिची चेष्टा केली. मंडी शहरात मिळणाऱ्या कमी प्रतीच्या दुधामुळे उच्च दर्जाच्या दुधाची गरज तीला जाणवली. त्यातूनच डेअरीचा विचार आकार घेत गेला. फिटनेस, मॉडेलिंग आणि बॉक्सिंगची आवड असूनही तिनं कुटुंबीयांच्या विरोधाला न जुमानता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला. युट्यूबवरील माहिती आणि स्थानिक डेअरी शेतकरी चिंता देवी यांच्या प्रोत्साहनामुळे तिचा आत्मविश्वास आणखी वाढला.

कर्ज, गुंतवणूक आणि पहिली पायरी

जुलै 2024 मध्ये तिनं साठवलेल्या 1.25 लाखांसोबत 2 लाखांचं ग्रामीण बँक कर्ज घेतलं आणि फार्मची उभारणी सुरू केली. पंजाबमधील बठिंडा येथून उच्च दूधउत्पादनासाठी प्रसिद्ध होल्स्टीन फ्रीजियन गायी विकत घेतल्या. आधुनिक शेड, चारा कटर, मिल्किंग मशीन यांवर जवळपास 4.5 लाखांची गुंतवणूक झाली. आज तिच्या फार्मवर 14 एचएफ गायी असून त्या रोज सुमारे 112 लिटर दूध देतात. सेंद्रिय खत तयार करण्यासाठी शेणाचा उपयोग करून हा फार्म पर्यावरणपूरकही बनला आहे.

टर्निंग पॉईंट 

नोव्हेंबर 2024 मध्ये तिच्या गावात कूण महिला दुग्ध उत्पादक सहकारी समिती सुरू झाली आणि याच क्षणानं तिच्या प्रवासाला वेग आला. हिमाचल प्रदेश राज्य दुग्ध उत्पादक संघाच्या मदतीनं समितीला बल्क मिल्क कूलर, एसएनएफ ॲनालायझर, संगणकीकृत नोंद प्रणाली अशी आधुनिक साधनं उपलब्ध झाली. या समितीत सकीना दूध खरेदी आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका निभावते. सध्यातरी समितीने 70 कुटुंबांना जोडून जवळपास दोन लाखाचं मासिक उत्पादन निर्माण केलं आहे.

महिन्याला दीड लाखांची कमाई 

सकीना आज तिच्या फार्ममधून एकटीच अंदाजे 1.25 लाख रुपये प्रतिमहिना कमावते. दुधाच्या एमएसपीमध्ये 51 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ झाल्यानं तिचं उत्पन्न आणखी स्थिर झालं आहे. गुणवत्तेनुसार 41–44 रुपये प्रतिलिटर मिळत असल्याने ती समाधानी आहे. गावकरी तिच्या जिद्दीची आणि कामाच्या शिस्तीची प्रशंसा करतात. तिचं काम पाहून अनेक तरुण मुलींना ग्रामीण उद्योजकतेत पुढे जाण्याची प्रेरणा मिळत आहे.

ताज्या बातम्या व्यवसाय

Join WhatsApp

Join Now