पुणे तिथे काय ऊणे! चक्क बसस्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षीस

पुणे | पुण्यात काय होईल काय सांगता येत नाही. आतापर्यंत एटीएम, पैसे, किंवा पाकीट चोरी होण्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. पण सोशल मिडीयावर एका बसस्टॉपच्या जागेचा फोटो प्रचंड व्हायरत होत आहे.

या फोटोनुसार पुण्यातील एक बसस्टॉप चोरीला गेला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. कारण त्या फोटोवरून ते स्पष्ट होत आहे. एका नागरीकाने हा फोटो शेअर केला आहे आणि लिहीले आहे की, आमच्या परिसरातील बसस्टॉप कोणीतरी चोरून नेला आहे.

आता सध्या या जागेवर एक पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, बी. टी. कवडे देवकी पॅलेस समोरील परिवहन नागरीकांच्या सोयीचा बसस्टॉप चोरीला गेला आहे. जर कोणाला हा बसस्टॉप दिसला तर त्वरीत संपर्क साधा ५००० रूपये रोख रक्कम देण्यात येईल-मा. नगरसेवक प्रशांत म्हस्के.

एका ट्विटर युजरनेसुध्दा हा फोटो शेअर केला आहे. हसण्याची इमोजी टाकुन पुण्याचा बसस्टॉप चोरीला गेला असं कॅप्शन त्याने दिले आहे. या ट्विटला १२० लोकांनी लाईक केले आहे. अनेकांनी ही घटना खोटी असल्याचे म्हटले आहे. आणि काही जुण्या घटनांचा उल्लेख केला आहे.

दरम्यान, दोन वर्षांपुर्वी मनसेने असेच पोस्टर लावून पोलीस स्थानक चोरीला गेले असल्याचे म्हटले होते. कारण त्यांचे म्हणणे होते की, त्या स्थानकातील पोलीसांकडून नीट काम होत नव्हते त्यामुळे मनसेने हे पाऊल उचलले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.