सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात १० लोकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात सिन्नर तालुक्यातील वावी पाथरे या गावाजवळ झाला आहे. खासगी बस आणि ट्रक यांच्यात हा अपघात पहाटे झाला असुन बस आणि ट्रकचा चुराडा झाला आहे. नाशिकसह ठाणे जिल्ह्यालाही हादरवून देणारा हा अपघात आहे.
बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला आहे. या अपघातात अनेकांचा जागीच मृत्यू झाला असुन १५-२० जण जखमी झालेले आहेत. यात जखमी झालेल्या लोकांवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. अपघातानंतर लोकांच्या किंचाळ्या,आक्रोश सुरु होता. हा आवाज ह्रदय पिळवटणारा होता. या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी जे प्रवाशी होते त्यांनी या अपघाताचे वर्णन केले असता,अंगावर शहारे यावेत असे हे वर्णन होते.
या अपघातात आपला जीव वाचलेल्या एका प्रवाशाने या भयानक प्रसंगाचे कथन केले आहे. गाडीच्या वेगामुळे हा अपघात झाल्याचे त्याने सांगितले आहे. अंबरनाथवरून शिर्डीला दर्शनासाठी मध्यरात्री बारा साडे बाराच्या सुमारास बस निघाली असता रस्त्यात हा अपघात झाला. बस चालक बस वेगात चालवत असल्याचे सांगितले जात आहे. बस चालकाला तीन वेळा बस हळू चालवण्याचे सांगितले होते असे जीव वाचलेल्या प्रवाशाने नमुद केले आहे.
या नंतर पहाटे नाष्ट्यासाठी थांबले असता त्यावेळी देखील बस चालकाला बस हळू चालवण्याचे सांगितले होते. तरी देखील बस चालकाने वेगाला आवर घातला नाही असे अपघातातून बचावलेले प्रवासी तसेच प्रत्यक्षदर्शी विनोद राठोड यांनी सांगितले आहे. हा अपघात सकाळी सुमारे साडे सहाच्या आसपास झाला आहे. ‘अपघात केव्हा झाला हे आम्हाला कळालेच नाही’, असे प्रवासी सांगत आहे. कोण कुठे तर कोण कुठे पडलेले होते अशी भयानक परिस्थिती होती.
जखमींना सिन्नर येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. अतिवेगामुळे बसला अपघात झाला असल्याचे यावेळी अनेक जखमी प्रवाशांनी सांगितले आहे. बसचा वेग कमी असता तर हा अपघात झाला नसता असे इतर प्रवाशांचे मत आहे. बस वेगात असल्याने चालकाने तीन वेळा जोरात ब्रेक लावला आणि त्यामुळे धक्के बसले. आणि चौथ्यावेळेस तर अपघात झाला. असे जखमी झालेल्या महिला प्रवासी माया जाधव यांनी सांगितले आहे.
अशी सगळी माहिती ज्यांनी हे दृश्य अगदी जवळून पाहिले त्यातील एका अपघातग्रस्ताने आपल्या जीवावर बेतलेला हा भयंकर प्रसंग सांगितला आहे. प्रवाशांनी बस चालकालाच दोषी ठरवले आहे. या भीषण अपघाताची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी व्हावी अशी मागणी केली असता, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
बच्चू कडूंच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप, म्हणाले, भाजपच्या व्यक्तीकडून..
पतीचा अपघाती मृत्यु, दोन मुलांचा आक्रोश, शोकातून पत्नीनं केलं असं काही.., वाचून हादराल
सयाजी शिंदेंचं पहीलं मानधन येताच आईने दिली होती ‘ही’ धक्कादायक प्रतिक्रीया; वाचून हैराण व्हाल