अरे बापरे! ८ लाख ८० हजारांना विकला गेला द्राक्षांचा एक घड, काय आहे खासियत, वाचा..

फळांच्या किमती वाढत असतात, तसेच कमी देखील होत असतात. मात्र जगात काही अशी फळे आहेत, ज्याची किंमत लाखांमध्ये आहे. ही फळे खरेदी करणे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही. हे फळ म्हणजे हा एक द्राक्षांचा प्रकार आहे.

या द्राक्षांचा एक घड तब्बल ३० ते २५ हजारांना विकला जातो. हे खोटं वाटत असेल मात्र हे खरे आहे. हे फळ विकताना त्याचा लिलाव केला जातो. जो जास्त पैसे मोजणार त्याला हे फळ विकले जाते. यामुळे हे फळ मोठे लोकच खरेदी करू शकतात.या द्राक्षांना रुबी रोमन नावाने ओळखले जाते.

जापानमध्ये या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. या द्राक्षांचा आकार हा सामन्य द्राक्षांपेक्षा फारच मोठा असतो. तसेच ही द्राक्षं चवीला फार गोड आहेत. जापानमध्ये देखील इशिकावा प्री फ्रेक्चरल या एकमेव कंपनीकडून या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यामुळे याची किंमत देखील तशीच महाग आहे.

उत्पादन मर्यादित असल्याने त्यांना एवढा भाव आहे. मात्र अनेक श्रीमंत लोकांकडून याला मोठी मागणी आहे. ही द्राक्षं बाराजामध्ये विकत मिळत नाहीत. त्यांचा लिलाव केला जातो. २०२० मध्ये या द्राक्षांच्या एका घडासाठी तब्बल १२ हजार अमेरिकन डॉलर म्हणजे ८. ८ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती.

या किमतीमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जपानमध्ये मिळणारी फळे अशाच प्रकारे महाग आहेत. येथील आंबे देखील महाग मिळतात. आडीच लाखांना हा आंबा मिळतो. तसेच कलिंगड आणि इतर फळे देखील मोठ्या प्रमाणावर महाग आहेत.

मात्र किंमत जास्त असली तरी ही पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने पिकवली जातात. त्याची चव देखील वेगळी असते. यामुळे याला पिकवण्यासाठी मोठा खर्च देखील येत असतो. याला मात्र मोठ्या देशांमध्ये मागणी आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.