१६० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने जात होती बुलेट ट्रेन, ड्रायव्हर चालू ट्रेन सोडून गेला टॉयलेटला…

जपानला सर्वात वेगवान असलेल्या बुलेट ट्रेनमुळे एक वेगळी ओळख मिळाली आहे. तसेच त्यांचे नियम आणि तिथल्या सोई-सुविधांमुळे जापानला ओळखले जाते. त्यामुळे जपानच्या बुलेट ट्रेनचा प्रवास करण्यासाठी लांब लांब देशातून नागरीक येत असतात.

अशातच एक धडकी वाढवणारी बातमी जपानमधून आली आहे. बुलेट ट्रेनच्या एका ड्रायव्हरने भरधाव वेगात असणाऱ्या ट्रेनला सोडून टॉयलेटला चालल्या गेला होता. त्यामुळे त्याने शेकडों प्रवाशांचा जीव धोक्यात घातला होता.

घटना १६ मेची आहे, जेव्हा ट्रेनचा ड्रायव्हर त्याचे कॅबिन सोडून टॉयलेटला चालल्या गेला होता. ड्रायव्हरने हे तेव्हा केले होते, जेव्हा ट्रेन १६० किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने चालत होती. ३६ वर्षीय ड्रायव्हर कॅबिनपासून जवळपास ३ मिनिट बाहेरच होता.

या कालावधीत ड्रायव्हरने बुलेट ट्रेन चालवण्याची जबाबदारी कंडक्टरला दिली होती. पण कंडक्टरकडे ट्रेन चालवण्याचे लायसेन्स नव्हते. ही ट्रेन सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी शिजुओका प्रान्तमध्ये अटामी स्टेशनच्या आणि मिशिमा स्टेशनच्या मध्ये होती.

जपानमध्ये कंडक्टरचे काम प्रवाशांना सुरक्षित ट्रेनमध्ये बसवणे आणि त्यांना खाली उतरवण्याचे असते. या घटनेनंतर, मी जास्तवेळ थांबू शकत नव्हतो, कारण माझ्या पोटात दुखत होते, असे म्हणत ड्रायव्हरने माफी मागितली आहे.

त्यानंतर परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाने कंपनीला कर्मचाऱ्यांना जागरुक राहण्याच्या आणि नियमांचे पालन करण्याच्या सुचना देण्यास सांगितल्या आहे. अशी घटना जपानमध्ये पहिल्यांदाच घडली आहे.

महत्वाच्या बातम्या-

रोहितची एक्स-गर्लफ्रेंड होती खुपच हॉट आणि ग्लॅमरस, कोहलीमुळे झाले होते ब्रेकअप, पाहा फोटो
अग्गंबाई सुनबाईमध्ये कलाकाराने शिलाई मशीनला मारली लाथ; शिंपी समाज झाला आक्रमक
क्रुरतेचा कळस! हातपाय बांधून दलित तरूणाला पोलिसाकडून मारहाण, पाणी मागितले तर पाजले मुत्र

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.