कुत्र्यांना खाऊ घालत होते चिमुकले, अचानक इमारत कोसळली अन् आईसमोरच गेला दोन्ही मुलांचा जीव

दिल्लीच्या शोरा कोठी भागातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या भागात एक इमारत कोसळल्यामुळे दोन चिमुकल्यांसह आणखी एका जणाचा मृत्यु झाला आहे. या तीघांनाही ढिगाऱ्याच्या खालून काढण्यात आले आहे.

या इमारती खाली अजूनही ४ ते ५ लोक दबलेले आहे. यामध्ये मृत्यु झालेल्या मुलांचे वय १२ वर्षे आणि ७ वर्षे आहे. तर मृत्यु झालेल्या जेष्ठ नागरीकाचे वय ७२ वर्षे आहे. त्यांचे नाव रामजी दास आहे. संबंधित घटना मलकागंज परीसरात घडली आहे.

शोरा कोठी भागात राहणाऱ्या आयुषीला दोन मुले होती. सौम्या (१२) आणि प्रांशु (७). दररोज प्रमाणे, सोमवारी देखील ती आपल्या दोन मुलांना शिकवणीतून घेण्यासाठी गेली होती आणि त्यांच्यासोबत घरी परतत होती. दोन्ही मुले साई शक्ती इलेक्ट्रॉनिकजवळील दुधाच्या दुकानात थांबली आणि तिथे असणाऱ्या कुत्र्यांना खायला घालू लागली.

जेव्हा कुत्र्यांचा कळप तेथे जमला तेव्हा ते त्यांच्याबरोबर खेळू लागले. काही वेळ त्याची आई जवळच उभी राहिली. मग ती थोडी पुढे गेली आणि मुलांना घरी जाण्यास सांगितले. मुले घरी जाण्यापूर्वी तीन मजली इमारत त्यांच्यावर कोसळली आणि आईच्या डोळ्यांसमोर दोन्ही मुले ढिगाऱ्याखाली हरवली.

इमारत कोसळून मृत्युमुखी पडलेल्या मुलांचा शेजारी आणि नातेवाईक मोहितच्या मते, सौम्या आणि प्रांशु नेहमीप्रमाणे त्यांची आई आयुषीसोबत शिकवणीतून घरी परतत होते. वाटेत दोघे दुधाच्या दुकानाजवळ थांबले आणि कुत्र्यांना खाऊ घालू लागले.

काही वेळ त्याची आई सुद्धा त्याच्या जवळ उभी राहिली. पण, उशीर होत असल्यामुळे ती थोडी पुढे गेली आणि तिथून मुलांना घरी चालण्याचा आवाज आला. मुलांनी लगेच निघू असे सांगून ते कुत्र्यांना खाऊ घालू लागले.

काही वेळातच संपूर्ण इमारत मुलांवर कोसळली आणि ते ढिगाऱ्याखाली हरवले. क्षणभर त्याची आई काहीच समजू शकली नाही. तिच्या घशातून किंचाळसुद्धा निघाल्या नाही. भितीने ती ढिगाऱ्याकडे धावली आणि आपल्या मुलांना वाचवण्यासाठी ओरडू लागली.

लोकांनी पोलिसांना आणि नंतर एमसीडी अधिकाऱ्यांना बोलावले. थोड्याच वेळात अग्निशमन दलाचे वाहनही घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमने दोन्ही मुलांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि त्यांना हिंदुराव रुग्णालयात नेले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

अरे वाह! कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या
ब्रिटीशांच्या काळात भारतातील राजे-महाराजे काय करत होते? त्यांनी आवाज का नाही उठवला?
महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट फसला; सहा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.