महाराष्ट्रातील बुलढाणा(Buldhana) जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे. प्रेयसीने केलेल्या महागड्या मागण्यांमुळे शेगाव(Shegaon) परिसरातील एका तरुणाला तुरुंगाची हवा खावी लागली आहे. प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा तरुण साथीदारांच्या सोबतीने दुचाकी(Bike) आणि मोबाईल चोरी करायचा. प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्याच्या नादात तो तरुण अट्टल गुन्हेगार बनला.(buldhana boyfriend got arrested by police)
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी या तरुणाला त्याच्या साथीदारांसह ताब्यात घेतले. पोलिसांनी या तरुणाची चौकशी केली असता चोरीचे धक्कादायक कारण समोर आलं आहे. पोलिसांनी शाहरुख शेख फिरोज, मोबीन शेख हारून, अस्लम अमन खान आणि मुन्शीफ अल्ताफ खान यांना अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या आरोपींना पोलिसांनी शेगाव परिसरातून ताब्यात घेतलं होतं.
यावेळी पोलिसांना या आरोपींकडून विविध महागड्या वस्तू, दुचाकी आणि इतर ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. यानंतर पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली होती. यावेळी प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण चोरी करत असल्याची कबुली शाहरुख शेख फिरोज या आरोपीने दिली होती. आरोपीने सांगितलेले कारण एकूण पोलीस चक्रावले आहेत.
पोलिसांच्या अटकेत असणारे चारही आरोपी प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातील आहेत. या चारही आरोपींना महागड्या वस्तू वापरण्याची सवय लागली होती. यातच प्रेयसीच्या मागण्या कशा पूर्ण करायच्या, असा प्रश्न आरोपींना पडला होता. त्यामुळे या चारही तरुणांनी चोरी करण्याचा पर्याय निवडला. या चार आरोपींमधील शाहरुख शेख फिरोज हा पुढाकार घेऊन चोरी करायचा.
प्रेमात आंधळ्या झालेल्या या तरुणाने आपल्या साथीदारांच्या मदतीने शेगाव परिसरात अनेक चोऱ्या केल्या. पोलिसांकडे यासंबंधित अनेक तक्रारी आल्या होत्या. पोलिसांना या टोळीचा अनेक दिवस तपास करत होते. अखेर पोलिसांना या टोळीचा सुगावा लागला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत या चारही आरोपींना अटक केली.
शेगाव परिसरात चोऱ्या करणारे हे चारही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाची सध्या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात चर्चा सुरु आहे. व्हेलेंटाईन डे च्या दिवशीच ही बातमी समोर आली आहे. प्रेयसीच्या मागण्या पूर्ण करता-करता प्रियकर गुन्हेगार झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
काळ आला होता, पण यमराज नाही; मुंबईतील रेल्वे क्रॉसिंगवर बाईकचा भयानक अपघात, पहा व्हिडिओ
रणधीर कपूर यांची भिकाऱ्याने उडवली होती खिल्ली, हसत हसत म्हणाला, ‘एवढी छोटी गाडी वापरता का?’
‘संज्याने जी भाषा पत्रकार परिषदेमध्ये वापरली ती महाराष्ट्राच्या कुठल्या संस्कृतीत बसते हे शिवसेनेने सांगावं’