खासदार म्हणतात, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ४०० कोटी खर्च करण्यापेक्षा ४ रूग्णालय उभारा

औरंगाबाद | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात अजित पवार यांनी शिक्षण, शेती, आरोग्य, वाहतूक, महिलावर्ग यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या निधींची तरतूद केली आहे. तसेच अनेक योजना राबवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अर्थमंत्र्यांनी ४०० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारला बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याऐवजी राज्यात मोठी रूग्णालय उभारा, असा सल्ला दिला आहे.

औरंगाबादचे एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत म्हटले की, “बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी ४०० कोटी रूपये खर्च करण्यापेक्षा प्रत्येकी १०० कोटी खर्च करून राज्यात ४ मोठी रूग्णालय उभारावीत. तसेच रूग्णालय उभारून रूग्णालयांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच नाव दिले तरी आमची काहीच हरकत नाही”. असं जलील म्हणाले आहेत.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता राज्याला स्मारकांची नाही, तर मोठ्या रूग्णालयांची गरज असल्याचंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
म्हत्वाच्या बातम्या-
कोरोना लस घेण्याबाबत रतन टाटांनी भारतीय नागरीकांना केले ‘हे’ आवाहन
मोठी बातमी! रेखा जरे हत्याप्रकरण, पत्रकार बाळ बोठेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पुणेकरांचा नादच नाय! पुण्याचा हा चार वर्षांचा चिमुकला महिन्याला कमावतो दिड लाख रूपये 
आणखी किती वर्ष तपास करणार?, दाभोळकर, पानसरेंच्या हत्या प्रकरणी हायकोर्टाचा संतप्त सवाल

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.