महिलावर्गासाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांनी केली महत्त्वाची घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मली सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला असून यावेळी काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलावर्गासाठीही अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मली सीतारामन म्हणाल्या, ‘महिलांना सर्व श्रेणींमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नाईट शिफ्टमध्येही त्यांना काम करता येणार आहे. यासाठी सुरक्षाही प्रदान केली जाईल,’ असे त्या म्हणाल्या.

वाचा अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा…
७५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना करमुक्ती –
२०२० मध्ये एकूण ६ .४८ नागरिकांनी आयकर भरला. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ट नागरिकांना कमी टॅक्स द्यावा लागणार आहे. तसेच पेन्शन आणि व्याजाच्या माध्यमातून आलेल्या मिळकतीवर वरिष्ठ नागरिकांना कर भरावा लागणार नाही, तशी घोषणा नीर्मला सीतारमण यांनी केली आहे.

आपत्कालीन निधीत मोठी वाढ, ३० हजार कोटींची तरतूद –
कोरोना महामारी संकटामुळे देशाला आर्थिक पातळीवर मोठा फटका बसला. अशा आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने आपत्कालीन निधीत भरीव वाढ केली आहे. केंद्राने आपत्कालीन निधी ५०० कोटींवरून ३० हजार कोटींपर्यंत वाढवला आहे.

कापूस आणि रेशीम उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ –
कापूस आणि रेशीम उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ केल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या
‘विरुष्का’च्या लेकीचं झालं बारसं; नाव वाचून आश्चर्य वाटेल…
मोठी बातमी! कोरोना लसीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले..
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; बजेटच्या दिवशीच बदलणार ‘या’ गोष्टी…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.