मोठी बातमी! कोरोना लसीकरणासाठी अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा; म्हणाले..

मुंबई | कोरोनामुळे देशाच्या आरोग्य क्षेत्राची जाणीव आपल्याला करुन दिली आहे. त्यामुळेच, यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राला भरभरुन देण्यात आले आहे. सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्राचं बजेट ९४ हजार कोटी रुपयांवरून २.३८ लाख कोटी रुपये केले आहे.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात मोदी सरकारने ४.३९ लाख कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात ३५,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण पुढे म्हणाल्या की, ‘सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्रातचं बजेट ९४ हजार कोटी रुपयांवरून २ .३८ लाख कोटी रुपये केले आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, कोरोना कालावधीतील तीन आठवड्याच्या लॉकडाऊनदरम्यान पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची सुरूवात करण्यात आली असून याचा फायदा देशातील ८० कोटी लोकांना झाल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी दिली.

महत्त्वाच्या बातम्या
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; बजेटच्या दिवशीच बदलणार ‘या’ गोष्टी…
कोरोनाकाळात पाच महीने घरी बसूनही तुम्हाला पगार दिला, आता जरा दुसऱ्यांच्या वेदनांचा विचार करा
‘अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती’, बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाने व्यक्त केली नाराजी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.